महामार्ग डुमरी स्टेशन नवनिर्मित उडाण पुलालगत ट्रव्हल्सची दुचाकीला धडक पोलिसाचा मुत्यु 

महामार्ग डुमरी स्टेशन नवनिर्मित उडाण पुलालगत ट्रव्हल्सची दुचाकीला धडक पोलिसाचा मुत्यु 

#) महामार्ग डुमरी स्टेशन नवनिर्मित उडाण पुला चे काम कासव गतीने अपघातास निमत्रण. 


कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील डुमरी स्टेशन येथे नव निर्मित उडाण पुलाचे काम सुरू असुन ये-जा करिता एकच रस्ता असल्याने देवलापार वरून कामावरून नागपुर ला घरी परत जाणा-या पोलीस कर्मचा-यांच्या दुचाकी ला नवनिर्मित उडाण पुलालगत जबलपुरला जाणा-या  ट्रॅव्हल्सने  दुचाकी वाहनास जोरदार धडक माल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक पोलीस कर्मचारी गोपीचंद कांबळे चा घटनास्थळीच मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी ट्रव्हल्स चालका विरूध्द गुन्हा नोंद करून पुढील तपास करित आहे.   

           पोलीस सुत्राकडुन मिळालेल्या माहिती नुसार  शुक्रवार (दि.१२) नोव्हेंबर २०२१ ला सकाळी ८ ते ९ वाजता दरम्यान मृतक देवलापार पोलीस स्टेशन कर्म चारी गोपीचंद नामदेवराव कांबळे वय ५१ वर्ष राहणार पांहुंरग नगर हिगणा रोड, डिगडोह नागपुर हा आपल्या दुचाकी वाहन क्र. एम एच ४० इ ४४८० ने रात्रपाळी करून नागपुर ला घरी परत जात असताना नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील डुमरी रेल्वे स्टेशन येथे नवनिर्मित उडाण पुलाचे काम सुरू असुन ये-जा करिता एकच रस्ता असल्याने जबलपुर कडे जा णा-या ट्रॅव्हल्स बस क्र.एम पी २२ पी २९६५ च्या चाल काने आपले वाहन निष्काळजीपणाने वेगाने चालवुन दुचाकीला धडक मारल्याने अपघातात दुचाकीसह चालक रस्त्यावर खाली पडुन डोक्याला, दोन्ही हाताला , दोन्ही पायाला जबर मार लागुन रक्त स्त्राव झाल्याने घटनास्थळीच पोलीस कर्मचारी गोपीचंद कांबळे चा मुत्यु झाला. घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळ ताच नापोसी राहुल रंगारी व पोलीस कर्मचारी घटना स्थळी पोहचुन पंचनामा करून गोपीचंद कांबळे चा मुत्युदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात श्वविच्छेदना करिता पाठवुन घायल काही लोकांना उपचारा करिता रुग्णालयात हलविण्यात आले. कन्हान पोलीसांनी  सरकार तर्फे नापोसी राहुल रंगारी च्या तक्रारीवरून आरोपी ट्रव्हल्स चालका विरुद्ध अप क्र ४३७/२०२१ कलम २७९, ३०३ (अ) भादंवि सह कलम १८४, १३४, अ, ब मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात नापोशि राहुल रंगारी हे करीत आहे. 

            नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील रेल्वे स्टेशन चौकात अपघाताचे प्रमाण वाढुन अपघात स्थळ झाल्याने डुमरी स्टेशन चौकात अंडर ब्रिज न देता अण्णा मोड व डुमरी स्टेशन चौकाच्या मध्यतंरी अंडर ब्रिज देऊन या नविन उडाण पुलाचे  मागील कित्येक दिवसा पासुन नवनिर्मित उडाण पुला चे काम कासव गतीने सुरु असल्याने एक पदरी रस्ता सुरू असुन मोठया प्रमाणात धुळ उडत असुन कुठ ल्याही प्रकारचे नाम, व सरक्षा फलक लावलेले नसुन सुरक्षा गार्ड कर्मचारी सुद्धा ठेवण्यात आलेला नाही. या उडाण पुलाचे काम सुरू होताच पहिल्यांदाच भाजी पालाच्या मेटाडोअर चा अपघात होऊन रामटेक च्या व्यकतीचा मुत्यु झाला होता. उडाणपुल निर्माण कंत्राट दारांच्या निष्काळजीपणा व लापरवाहीमुळे वारवांर या मार्गावर अपघात होऊन निर्दोष लोकांना अपंगत्व येत काहीचा मुत्यु होऊन बळी जात असल्याने यास दोषी कंत्राटदारावर सहदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कर ण्याची मागणी परिसरातुन जोर धरू लागली आहे. 

१) मुतक गोपीचंद कांबळे चा फोटो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नांदगाव बखारी राख तलावाच्या पंप हाऊस चे ट्रान्सफार्मर चोरी

Fri Nov 12 , 2021
नांदगाव बखारी राख तलावाच्या पंप हाऊस चे ट्रान्सफार्मर चोरी कन्हान : – खापरखेडा औष्णिक विधृत केंद्रातुन निघणा-या जळालेल्या कोळसा राखे करिता पेंच नदी काठालगत नांदगाव बखारी च्या परिसरात नवनिर्मित राख तलावाच्या पंप हाऊस येथे लावलेले ट्रान्सफार्मर अज्ञात आरोपीने चोरी करून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील […]

You May Like

Archives

Categories

Meta