आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे राज्यव्यापी बेमुदत संप

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे राज्यव्यापी बेमुदत संप

#) कन्हान च्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकां नी संपात सहभागी होत निर्दशने केले. 

कन्हान : – आयटक व महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्त क कर्मचारी कृती समितीने राज्य शासनाकडे समस्या सोडविण्याच्या मागण्याचे निवेदन सादर केलेत परंतु सदर प्रश्नाकडे पुर्ण दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे व समाजाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी मागण्या पुर्ण करण्याकरिता बेमुदत संप पुकारण्यात आला असुन कन्हान ला सुध्दा संपात सहभागी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी निर्देशने देऊन मागणी केली. 

      महाराष्ट्र राज्यात कोविड -१९ चा प्रार्दुभाव आटो क्यात आणण्यासाठी व मृत्युचे प्रमाण कमी करण्या साठी राज्य शासनाने कडक निर्बध लागु करून सार्व त्रिक लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. या कामा करिता राज्यातील आशा स्वयसेविकांचा व गटप्रवर्त काचा सक्तीने समावेश करण्यात आला आहे. त्यात आशांनी घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करून सर्वे करणे, त्यांचे रेकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीक रण अंतर्गत कॅम्प मध्ये हजर राहुन कामे करणे आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. या व्यतिरिक्त त्यांना नियमितपणे नेमुन दिलेली ७२ पेक्षा जास्त कामे करा वी लागतात. सदर कामाचा बोझा आशा व गटप्रवर्त कांवर टाकल्यामुळे त्यांच्यावर शारिरिक ताण येत आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे प्रश्न सोड विण्यास वारंवार कृति समितीने राज्य शासनाकडे निवेदने सादर केलीत परंतु राज्य शासनाकडून सदर प्रश्नांकडे पुर्ण दुर्लक्ष केले जात असल्याने समस्येच्या प्रश्नावर कृती समिती बरोबर चर्चा करून सोडविण्या ची राज्य शासनाला विनंती केली आहे. दि. १४ जुन पर्यंत समाधानकारकरित्या प्रश्न सुटले नसल्याने शास नाचे व समाजाचे लक्ष वेधण्यासाठी, महाराष्ट्र राज्याती ल सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक समिती व्दारे दि.१५ जुन पासुन बेमुदत संप पुकारून महाराष्ट्र सर कारने राज्यातील ६८ हजार आशा स्वयंसेविका व ४ हजार गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दयावा. मागण्या मान्य होईपर्यंत आशा स्वयंसेविकांना १८००० रू व गटप्रवर्तकांना २२००० प्रतिमहा वेतन देण्यात यावे आदी विविध समस्याच्या माग़ण्या मान्य होई पर्यंत कॉम्रेड श्यामजी काळे महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटना (आयटक) यांच्या नेतुत्वात राज्या त बेमुदत संप पुकारण्यात आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे परिसरातील किरण लेंडे, कौशल्या गणोरकर, तराशी डहाटे, प्रिती वाघमारे, रजंनी चकोले, निर्मला पवार, नलिनी साकोरे, लिला बर्वे, गुंमथा मनग टे, बिंदु साहानी, सारिरा वासे, सारिका धारगावे, श्रध्दा चकोले, धनश्री खेडेकर, माला थुटे, माला कांबळे, सारिका छानिकर, वैशाली बोरकर, रंजना गणोरकर, वंदना शेंडे, मंजु शेंडे, आम्रपाली पाटील, वर्षा उरकुडे आदी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हयानी उपस्थि त होऊन निदर्शने करून मागण्या मंजुर करण्याची शासनास मागणी केली.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राष्ट्रमाता जिजाऊ स्मृती दिनी जिजाऊ ब्रिगेड व बार्टी समतादुत व्दारे वृक्षरोपन

Thu Jun 17 , 2021
राष्ट्रमाता जिजाऊ स्मृती दिनी जिजाऊ ब्रिगेड व बार्टी समतादुत व्दारे वृक्षरोपन कन्हान : – जिजाऊ ब्रिगेड कन्हान व डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत प्रकल्पा अंतर्गत राजीव गांधी बालोद्यान व सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे जिजाऊ ब्रिगेड व समतादुत च्या सयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ स्मृती दिनी अभिवादन […]

You May Like

Archives

Categories

Meta