जि प व आरोग्य अधिका-यांची कन्हान, साटक प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

जि प व आरोग्य अधिका-यांची कन्हान, साटक प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

कन्हान : –  कोरोना चा वाढता प्रादुभाव रोखण्या करिता जि प आरोग्य विभागा व्दारे कोरोना रूग्ण तपासणी व कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू असल्याने जि प नागपुरचे सीईओ व जिल्हा आरोग्य अधिकारी हयांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक ला अचानक भेट देत लसीकरण केंद्राची पाहणी करून समयोचित मार्गदर्शन केले. 

        शासनाच्या निर्देशान्वये (दि. शुक्रवार (दि.२) एप्रिल पासुन ४५ वर्ष व त्यावरील वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रकिबंधक लस लावण्यास प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे देण्यास मोहीम सुरू करण्यात आली असुन कन्हान व जि प गोंडेगाव सर्कल परिसरात कोरोना रूग्ण वाढती संख्येवर नियत्रंण करण्याच्या दुष्टीने जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी (सीईओृ) मा. योगेश कुंभजेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिपक सेलोकर हयानी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक ला भेट देऊन कोरोना तपासणी व लसीकरण केंद्राची पाहणी करून संबधित आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांना परिसरात लसीकरणावर भर देत समयसुचकता बाळगत नागरिकांना आरोग्य सेवा देण्यास समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी खंड विकास अधिकारी मा खाडे साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, तालुका कोरोना विभाग प्रमुख डॉ अन्सारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानचे डॉ योगेश चौधरी, डॉ गोडाणे मॅडम, साटक च्या डॉ वैशाली हिंगे, डॉ. आकरे मॅडम सह आरोग्य कर्मचारी तसेच जि प गोंडेगाव सदस्य व विरोधी पक्ष गटनेता व्यंकटजी कारेमोरे, साटक सरपंचा सिमाताई उकुंडे प्रामुख्याने उपस्थित होते. 

        जिल्हा परिषद सीईओ मा. योगेश कुंभजेकर  हयानी साटक प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ला भेट दिली असता विरोधी पक्ष गटनेता व जिल्हा परिषद सदस्य वेंकटजी कारेमोरे यानी गोंडेगाव जिल्हा परिषद सर्कल परिसरात वाढत्या कोरोना प्रादुभावाची माहिती देत जास्तीत जास्त वैक्सीन (लसीकरण) व सॅनिटाईझे शन फवारणी व प्रतिबंधक उपाय योजनाची काटेकोर पणे अमलबजावणी वर भर देऊन वाढत्या रूग्ण संख्येवर नियत्रंण करण्याची विनती केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात ५९ कोरोना रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

Fri Apr 2 , 2021
कन्हान परिसरात ५९ कोरोना रूग्णाची भर   #) कन्हान चाचणीत ४५, स्वॅब ९ व साटक ५ असे एकुण ५९ रूग्ण आढळुन एकुण १९९७ रूग्ण.       कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे शुक्रवार (दि.२) एप्रिल ला रॅपेट १२३ चाचणीत ४५, (दि.३१) स्वॅब चे ९ व प्राथमिक आरोग्य […]

You May Like

Archives

Categories

Meta