कन्हान नदी काठावर संजीव महालोधी चा मुतदेह गळफास घेतलेला मिळाला

कन्हान नदी काठावर संजीव महालोधी चा मुतदेह गळफास घेतलेला मिळाला. 

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत जुनिकामठी वरून घाटरोहणा गावाकडे  जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला कन्हान नदिचा पात्रा लगत असलेल्या झाडाला संजीव महालोधी यांचा मुतदेह गळफास घेतलेला अवस्थेत मिळुन आल्याने फिर्यादीं मुलाच्या तोंडी बयाणा वरून कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 

      प्राप्त माहितीनुसार बुधवार (दि.४) ऑगस्ट २०२१ चे ६.३० वाजता दरम्यान संकेत संजीव महालोधी वय २२ वर्ष राह. विवेकांनद नगर कन्हान यांचे वडील नामे संजीव हिरालाल महालोधी वय ४७ वर्ष रा.विवेकानंद नगर कन्हान हे त्याची दुचाकी वाहन गाडी क्र. एम एच ४० एयु ११४१ घेवुन घरी कोणाला काही न सांगता निघुन गेले. संकेत महालोधी चे काका हे त्याचा परिसरात शोध घेत असता शनिवार (दि.७) ऑगस्ट २०२१ चे सकाळी ११ वाजता दरम्यान जुनिकामठी वरून घाटरोहणा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला कन्हान नदी पात्राच्या काठा लगत असलेल्या झाडाला गळफास घेऊन मुत अवस्थेत संजीव हिरालाल महालोधी दिसुन आल्याने कन्हान पोलीसाना माहीती देताच कन्हान पोस्टे चे पो नि (गुन्हे) यशवंत कदम, उप पो नि अमित कुमार आत्राम, हेकॉ जयलाल सहारे कर्मचा-या सह घटनास्थळी पोहचुन मुतदेह खाली उतरवुन ताब्या त घेऊन कामठी उपजिल्हा ग्रामिण रूगणालय येथे शवविच्छेदना करिता पाठवुन फिर्यादी मुलगा संकेत संजीव महालोधी याने सदर मृतकाचा मारणा बाबत कोणावरही शक व संशय नाही असे सांगितल्याने त्यां च्या तोंडी बयाणा वरून कन्हान पोलीसांनी मर्ग क्र २९/२१ कलम १७४ जाफौ दाखल करून तपासात घेतला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे सपोनि अमित कुमार आत्राम हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भुमिपुत्र प्रतिष्ठाण व्दारे कांद्री-कन्हान ला विजय जल्लोष साजरा

Mon Aug 9 , 2021
भुमिपुत्र प्रतिष्ठाण व्दारे कांद्री-कन्हान ला विजय जल्लोष साजरा.  कन्हान : –  टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारत देशा करि ता खेळाडु निरज चोपडा यांनी ९० मीटर भाला फेकुन गोल्ड मेडल जिंकल्याबद्द्ल कांन्द्री येथे भुमिपुत्र युवा प्रतिष्ठान व भाजपा युवा मोर्चा कांद्री द्वारे विजय जल्लोष साजरा करण्यात आला.      भुमिपुत्र युवा प्रतिष्ठाण व […]

You May Like

Archives

Categories

Meta