युवक कॉग्रेस मोर्चाने कृषी व कामगार विधेयक मागे घेण्याची मागणी : कन्हान

युवक कॉग्रेस मोर्चाने कृषी व कामगार विधेयक मागे घेण्याची मागणी. 

कन्हान : –  कृषी विधेयक व कामगार विधेयक बिल घाईघाईने मंजुर केल्याच्या निषेधार्थ कन्हान ला सायंकाळी युवक काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा काढुन केंद्र सरकारने दोन्ही विधेयके मागे घेण्याची मागणी करण्यात आली. 

     डॉ आंबेडकर चौक कन्हान येथे गुरूवार (दि.२४) ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून युवक काँग्रेसचे नेते मा. कुणाल राऊत, नागपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राहुल सीरिया, रामटेक विधानसभा अध्यक्ष निखिल पाटील, रामटेक विधानसभा महासचिव आकीब सिद्दीकी, जिल्हा उपाध्यक्ष मोहसीन खान, युवक काँग्रेस कन्हान अध्यक्ष राजा यादव आदीच्या नेतुत्वात मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक युवा मशाल घेऊन सहभागी झाले होते.

कृषी विधेयक व कामगार विधेयक बिल सरकारने परत घ्यावे, बेरोजगारांना रोजगार द्यावा, राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने निघुन मोर्चाचे समापन तारसा रोड लाल बहादूर शास्त्री चौकात करण्यात आले.

मोर्चात सतीश भसारकर, सारंग काळे, प्रदीप बावणे, नगरसेवक रेखा टोहने, कुशल पोटभरे अजय कापसीकर, महेश धोंगळे  सह अनेक युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर तहसिल कोरोना अपडेट : एकुण १८०८

Fri Sep 25 , 2020
एकुण पोजिटिव रुग्न : १८०८ एकुण बरे रुग्न : १२३९ अँक्टिव रुग्न : ५३५ गृहविलगीकरण रुग्न : ४६५ मृत्यु : ३४ दररोज कोरोना बाधित रुग्न संख्या वाढत चालेली आहे. तशे ; बरे ही चांगल्याच प्रमाणात होत चाललेले आहेत, हि बाब चांगली आहे. खोट्या अफवेवर विश्वास न ठेवता बरे न वाटता […]

You May Like

Archives

Categories

Meta