धर्मराज शैक्षणिक संस्थेतर्फे कल्याणी सरोदेंचा सत्कार

*धर्मराज शैक्षणिक संस्थेतर्फे कल्याणी सरोदेंचा सत्कार*

कन्हान – येथील प्रसिद्ध ब्युटीशीयन कल्याणी सरोदे हिचा नुकताच धर्मराज शैक्षणिक संस्थेतर्फे आज (ता ६) कौटुंबिक सत्कार करण्यात आला.
धर्मराज शैक्षणिक संस्थेतून २००८ रोजी शिक्षण घेतलेल्या कल्याणीने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून ब्युटीशीयन मध्ये करीअर अजमावले आहे. ती सध्या एक नामांकित ब्युटीशीयन असून चित्रपट सृष्टीतील राहूल वैद्य, विकास महाजन, रविशंकर शहा, प्रसाद ठवकर या सारख्या दिग्गज कलाकारांचे मेकअप केले आहे. नुकताच २८ आॅगस्ट रोजी गोवा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता सोनू सुद यांच्या हस्ते “इंटरनॅशनल बेस्ट मेकअप आर्टिस्ट” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    शिक्षक दिनाच्या निमित्ताने धर्मराज शैक्षणिक संस्थेतर्फे अनील सार्वे, अनिरुद्ध जोशी, सुनील लाडेकर, अनिल मंगर, हरिष केवटे, नरेंद्र कडवे, उदय भस्मे, सतीश राऊत, प्राथमिक विभागाचे खिमेश बढिये, प्रशांत घरत, विलास डाखोळे, राजू सिंग राठोड यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सोनु सुद यांच्या हस्ते कल्याणी सरोदे ला इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड 2021

Thu Sep 9 , 2021
*सोनु सुद यांच्या हस्ते कल्याणी सरोदे ला इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड 2021 कन्हान – नागपुर येथे विविध क्षेत्रात अलौकिक बुद्धिमत्ता मध्ये कांन्द्री कन्हान रहिवासी कल्याणी सरोदे शहरात मेकअप आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे.. गोवा च्या रेगिज पार्क रिसॉर्टमध्ये (दि २८)ऑगस्ट ला आयोजित कार्यक्रमात देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात […]

You May Like

Archives

Categories

Meta