रिंगणातील उमेदवाराचे नाव यादीतून गहाळ ? पारशिवणी तालुक्यात ‌‌७३.८६ टक्के मतदान

रिंगणातील उमेदवाराचे नाव यादीतून गहाळ ?

पारशिवणी तालुक्यात ‌‌७३.८६ टक्के मतदान

कन्हान,ता.१८ डिसेंबर
पारशिवनी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचा निवडणूक प्रचार‌‌ प्रसार ‌शुक्रवारला थांबवण्यात आला होता.‌ शनीवारी ‌मतदाराना प्रलोभन दाखवत चुप्पी बेढकी पार पडल्या तर ‌रविवार‌ (दि.१८) डिसेंबर रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत‌‌ चोख पोलिस बंदोबस्त तैनात करून शांततामय मतदान केंद्रावर मतदारांनी ‌मतदान केले.

   खंडाला (डुमरी), वाघोड़ा, कर्भाड, पारडी, इमरी (कला), खंडाला (मरियंवी) आणि दहेगाव (जोशी) मध्ये सरपंच पदासाठी सरड टक्कर होती. टेकाड़ी (खदान), नीलज, बखारी, पालोरा, नयाकुंड, तामसवाड़ी मध्ये त्रिकोणी लडत बगाला ‌मिळाली. नांदगाव, बोरडा (गणेशी), सालाई (मोकासा), जुनी कामठी, सालई (माहुली), मेहंदी ४-४, साटक ५ तर गोंडेगावात सर्वाधिक ७ प्रत्याशी मैदानावर होते. २१ ग्राम पंचायतींमध्ये १७७ सीटसाठी ४३१ उमेदवार ‌आपले भविष्यातील ‌विजया करीता रविवारी सकाळ ‌पासुन सायंकाळी प्रयत्न करत होते.

   पारशिवनी तालुक्यांतील सर्वाधिक 17 सदस्यीय टेकाड़ी (खदान) ग्रामपंचायतीमध्ये ५८ उमेदवार मैदानात होते. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पुढारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपसभापती, सदस्य यांचा प्रतीष्ठेचा प्रश्न पणाला लागलेला असल्याने ‌‌मतदान केंद्रावर मतदारांशी‌ संवाद साधताना दिसत होते.

    गोंडेगाव येथे तीन बुध पेक्षा पहिल्या बुध मध्ये मतदारांनी सायंकाळी मोठी गर्दी करत वेळ झाल्यावर सुध्दा मतदान होत असल्याचे दिसून आले. तर कन्हान हद्दीतील बोरडा गणेशी येथे सरपंच पदासाठी ४ उमेदवार तर सदस्य साठी सतरा उमेदवार रिंगणात उभे होते येथे एक सरपंच साथ उमेदवार यांनी आपले भविष्य लढवत असताना यामध्ये सरपंच पदासाठी चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. चार उमेदवार रविवारी (दि18) तारखेला मतदार केंद्रावर मतदार हक्क बजावत असताना एक सरपंच पदासाठी उमेदवार यांची यादी मध्ये नाव नसल्याने तो आपला मतदाराच्या हक्क बजावू शकला नाही. यादीमध्ये नाव नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तर सदस्य म्हणून दोन सदस्यांचे या यादीमध्ये नाव नसल्याने त्यांना सुद्धा मतदान करता आले नाही.‌यात मनीषा सतीश डडूरे (सरपंच उमेदवार- स्वतंत्र), तसेच प्रियंका अजय सोनेकर ( उमेदवार ), ज्योती प्रल्हाद उके‌ ( उमेदवार) त्यामुळे त्यांच्या सुद्धा गोंधळ निर्माण झाला त्यांनी त्यांची तक्रार तहसील पारशिवनी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.

    तहसीलदार मार्फत उमेदवार सरपंच आणि सदस्य यांनी विधानसभेच्या यादीनुसार आपला अर्ज दाखल करण्यात आलेला होता. पण केंद्रप्रमुखाकडे नवीन यादी प्रमाणे नाव नसल्याने त्यांना आपला हक्क बजावता आला नाही. यामुळे उमेदवार नाराज होऊन चांगलीच फजिती झाल्याने त्याची भरपाई कोण देणार आणि कुणाचं यात दोष आहे त्यावर रितसर कारवाई करण्यात यावी अशी उमेदवाराची आणि गाववाल्यांची मागणी आहे. पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारे मतदारसंघावर चोख पोलीस बंदोबस्त लावून कुठलाही अनुचित प्रकार न होता शांततेमय वातावरणात मतदान पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अवैधरित्या वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर-ट्राॅली जप्त  ३,०३,००० रुपयांचा मुद्देमालासह वाळू व ट्रॅक्टरवर कारवाई 

Mon Dec 19 , 2022
अवैधरित्या वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर-ट्राॅली जप्त ३,०३,००० रुपयांचा मुद्देमालासह वाळू व ट्रॅक्टरवर कारवाई कन्हान,ता.१८ डिसेंबर     मौजा टेकाडी शिवार येथे एक लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि बिना नंबरची ट्राली कन्हान शहरातील रस्त्याने अवैधरित्या वाळू वाहतुक करतांना आढळून आल्याने पोलीसांनी एक ब्रास वाळू, ट्रॅक्टर सह एकुण ३,०३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन […]

You May Like

Archives

Categories

Meta