धर्मराज प्राथमिक शाळेच्या “भारत माता की जय” च्या घोषणेने दुमदुमली कांद्री नगरी

कन्हान,ता.८ ऑगस्ट
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धर्मराज प्राथमिक शाळेच्या वतीने “सन्मान तिरंगा” जनजागृती रॅली आज (ता. ८) कांद्री नगरात काढण्यात आली.
धर्मराज प्राथमिक शाळेच्या वर्ग तिसरी व चवथी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेत ‘भारत माता की जय’ चा जयघोष करीत जनजागृती रॅली काढली. या रॅलीला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी हिरवा झेंडा दाखविला. अत्यंत शिस्तबद्ध रितीने चिमुकल्यांनी भारत माता की जय, हर घर तिरंगा, तिरंगे की रक्षा कोन करेंगा ? “हम करेंगे हम करेंगे “या घोषणा देत कांद्री गावात प्रभातफेरी काढली.

गांधी चौकात जनजागृती रॅलीचे ग्रामपंचायत कांद्री तर्फे सरपंच बलवंत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच बलवंत पडोळे, मुख्याध्यापक खीमेश बढिये यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शाळेच्या वतीने भिमराव शिंदेमेश्राम यांनी प्रास्ताविक करुन रॅलीच्या आयोजनाची भूमिका विशद केली. सरपंच बलवंत पडोळे यांनी चिमुकल्यांचे कौतुक करीत सर्वांनी “हर घर तिरंगा” हा राष्ट्रीय उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी धर्मराज प्राथमिक शाळेच्या वतीने या उपक्रमांतर्गत व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगून प्रत्येक पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
उपस्थितांचे आभार राजू भस्मे यांनी मानले. कांद्री ग्रामपंचायतच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना बिस्कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच बबलू बर्वे, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री शिवाजी चकोले, चंद्रशेखर बावनकुळे, राहूल टेकाम, प्रकाश चाफले, धनराज कारेमोरे, सौ.आशा कनोजे, मोनाली वरले, महेश झोडावणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विधिलाल डहारे, सौ.स्वाती गि-हे, गणेश सरोदे यांच्यासह मोठय़ा संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. जनजागृती रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी श्री भिमराव शिंदेमेश्राम, राजू भस्मे, सौ.चित्रलेखा धानफोले, कु. हर्षकला चौधरी, कु. शारदा समरीत, कु. अर्पणा बावनकुळे, सौ.सुनीता मनगटे यांनी सहकार्य केले.
Post Views:
779
Mon Aug 8 , 2022
रामेश्वरम ते काशी पदयात्रे करूचे कन्हान विकास मंच द्वारे भव्य स्वागत कन्हान, ता.8 ऑगस्ट तमिलनाडु येथील रामेश्वरम येथुन ते काशी विश्वनाथ मंदिर पर्यंत निघालेल्या पदयात्रा करूचे कन्हान शहर विकास मंच द्वारे फुलाच्या वर्षाव, मिठाई वाटप करून भव्य जोरदार स्वागत करण्यात आले. तमिलनाडु येथील रामेश्वरम गावातील भक्तांनी काशी (वाराणसी) पदयात्रेचे […]