खोट्या नकाशाचा आधारावर रजिस्ट्री लावून शासनाची दिशाभूल

खोट्या नकाशाचा आधारावर रजिस्ट्री लावून शासनाची दिशाभूल

सरकारी जागेवर लेआउट पाडून विक्री.

साईनगरी भूखंडधारकांची तक्रार, जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे

कन्हान,ता.05 ऑगस्ट

    कांन्द्री येथील साई नगरी लेआऊट सरकारी जागेवर मालकी हक्क दाखवून भूखंड पाडण्यात आले. भूखंडधारकांना भूखंड मालकांनी शासकीय संबधित विभागातील अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून खोट्या नकाशावर लेआऊट मंजूरकरून भूखंड विकून ग्राहकांसोबत फसवणूक केल्याचा पुराव्यांसहीत आरोप साई नगरी लेआऊट येथील भूखंडधारकांनी पत्रपरिषदेत केला.

     मौजा क्रांन्दी साई नगरी लेआऊट यात शासनाने मंजूर केला नकाशामध्ये 46 भूखंडला मान्यता दिली आहे. मात्र दुसर्‍या नकाशात 149 भूखंड पाडून अजय शेन्र्दे यांनी लेआऊट मध्ये तळेगाव दाभाडे राखीव जागा, युलसी जागा, ओपन स्पेस जागेवर मालक्की हक्क दाखून भूखंड पाडून काही ग्राहकांसोबत फसवणूक केली. पारशिवनी तालुक्यातील मौजा कांन्द्री ग्राम पंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 6 येथे साई नगरी नावाने टाकलेला लेआऊट पूर्ण पणे अनधिकृत व नियम बाहय आहे. लेआऊट भूखंड विकास योजना अंतर्गत ULC ACT 1976 नुसार तळेगाव दाभाडे द्वारे खसरा क्रमांक 255/2 मौजा कांन्द्री ता.पारशिवनी जिल्हा नागपूर चे 3.36 आर ( 30800 मी.स्के. ) क्षेत्रफळ मधून (16688.40 मी.स्के ) इतकी जागा भूखंडा करिता शासनाने मंजुरी दिली होती. तर उर्वरित जागा ही PU लॅन्ड, ओपन स्पेस व तळेगाव दाभाडे मध्ये सुटलेली जागा व रेसिडेंट व रेटनेबल करिता सोडण्यात आलेली जागा सध्या वर्तमानात दिसत नाही. लेआऊट जुलै 2004 मध्ये ओमशंकर एस.गुप्ता यांचा नावी होता .त्यांनी अजय शेन्दे यांना जमीन नियमानुसार विकली परंतु  2004 मध्ये मंजूर केलेल्या योजना प्रमाणे प्लॉट न विकता बनावटी नकाशा तयार करून सरकारी जागा, ओपन स्पेस , PU लॅन्ड,सरकारी पांधन व शासकीय योजनेतील जागेवर भूखंडधारकांची भूखंड विकून फसवणूक केली आहे. तसेच शासनाची दिशाभूल करून शासनाच्या अधिकाऱ्यांना खोटी माहिती पुरवून दुय्यम निबंधक कार्यालय पारशिवनी येथे खोट्या नकाश्याच्या आधारावर रजिस्ट्री लावून दिली. या सर्व विक्री मध्ये अजय शेन्र्दे यांनी कोठ्यावधी रुपये कमावले. विशेष  म्हणजे त्यांचा कुटुंबातील सदस्य ज्योती अजय शेंद्रे ही सरपंच असतांना PU लॅन्ड आणि ओपन स्पेस न सोडता बोगस कागदपत्रेच्या आधारावर व बोगस नकाशाच्या आधारावर टॅक्स लावून दिले. त्यांनी सरपंच पदावर असताना पदाचा दुरुपयोग केला असा आरोप करण्यात आला. दुय्यम निबंधक कार्यालय या लेआऊट च्या संदर्भात रजिस्ट्री व कुठलेही कागदपत्र तयार करण्यात येऊ नये याची खबरदारी रजिस्टार ने घ्यावी. अजय बाबूलाल शेंद्रे यांनी ही जागा निवासी वापराकरीता लेआऊट नकाशा मध्ये बददल करून शासनासोबत धोका करून मंजूरी घेण्यात आली असल्याचे आरोपात म्हटले आहे. अशी तक्रार जिल्हाधिकारी, नागपुर सुधार प्रण्यास, जीडीआर नागपूर, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधिक्षक, एल सी.बी ( क्राईम ब्रांच), उपविभागीय अधिकारी , तहसीलदार, सरपंच व सचिव कांन्द्री ,मंडल अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी, ठाणेदार, संबधीत विभाग यांच्या कडे तक्रार दाखल केली असल्याचे लेआऊट मधील नागरीकांचे म्हणणे आहे.पत्रकार परिषदेत विलास खोब्रागडे, मनोज मनगटे, मनोहर मोहुर्ले, किशोर मोहुर्ले, प्रदिप मोहोड, योगेश मोहोड, तेजस कुंबळे, राजेश गांजवे,ओमप्रकाश शास्त्रकार, प्रमोद शास्त्रकार, चंद्रशेखर शास्त्रकार, जिलेन्द्र वर्मा, हरिश वर्मा, सचिन मेश्राम, मिना मेश्राम, वामन डोंगरे, ज्योती राठोड, बबरूवान घोडमाले, गिताबाई धोडमाले, सुनील कुंभलकर, शैलेश बिंनझाडे, दिलीप मनगटे आदी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

============

प्रशांत सांगाडे, तहसिलदार पारशिवनी

साईनगरी लेआऊट मौजा कांन्द्री-कन्हान येथील प्रकरणाची तक्रार तहसील कार्यालय आलेली आहे.दोन्ही पक्षकांराला नोटीस देऊन त्यांचा ज्या काही समस्या असणार त्यावर तोडगा काढण्यात येईल.

========

बलवंत पडोळे ( सरपंच कांन्द्री )

   प्लॉट धारकांकडून ग्रामपंचायत कांन्द्री येथे तक्रारी आल्या त्यानुसार संबधित विभागाला पत्रव्यवहार केला आहे. लेआऊट धारकाला मालक्की हक्क असलेले जमिनीचे सर्व कागदपत्र मागीतले आहे. लेआऊटला याआधी असलेल्या बोडीने मंजुरी देण्यात आली होती त्यावेळेस ज्याती शेन्दे सरपंच पदावर होते.

==========

पुरावे सादर करण्यास कधीही सक्षम आहे..( अजय शेन्दे साई नगरी, लेआऊट मालक )

साईनगरी लेआऊट 2004 चा असुन गुप्ता यांचा मालकीचा होता. त्यांनी युलसी सोडविण्यासाठी नकाशा टाकला होता. त्यावेळेस त्यांचा पासुन मी 2013 मध्ये विक्त घेतला असल्याने एनआयटी आलेली होती. पण जुना नकाशा 22 याला अंतीम मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे नवीन नकाशा एनआयटी कडे अंतीम मंजुरी करीता पाठविण्यात आली. तळेगाव दाभाडे स्कीम मध्ये युलसी दोन वर्षात सोळवायची होती. स्कीम बंद झाली त्यामुळे नकाशा पास करण्याचा अधिकार एनआयटी आला. जर प्लाॅट धारकाला वाटत असणार की, जुण्या नकाशावर प्रशासन आरल करायला अंतीम मंजुरी देत असणार तर जुण्या नकाशाचा आधारावर विक्रीपत्र करू. समोर ग्रामपंचायत निवडणूका आल्या असल्याने मला आणी कुंटुंबाला बदनाम करण्याचा ठाव काही लोकांकडून हेतुपरस्पर करीत आहे. कन्हान शहरात एकाद्याचाही लेआऊटचा नकाशाला एनआयटीची मंजुरी नाही. तरी सुध्दा मोठ्याप्रमाणात प्लाॅट विक्री जोमात सुरू आहे. त्यांचा ही संपुर्ण लेआऊट ची चौकशी शासन प्रशासनाकडून करायला हवी असे अजय शेन्र्दे यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तपस्या फाऊंडेशन रामटेक व्दारे वृक्षारोपण

Fri Aug 5 , 2022
  तपस्या फाऊंडेशन रामटेक व्दारे वृक्षारोपण कन्हान, ता.5 ऑगस्ट तपस्या फाऊंडेशन रामटेक, अखिलेश हायस्कूल व ग्रामपंचायत साटक यांच्या संयुक्त वतीने ग्रामपंचायत साटक येथील सिद्ध हनुमानजी मंदिराच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. शालेय कार्यक्रमात विद्यार्थी व शाळेतील शिक्षक प्रदीप निरे, कैलास बी हुमणे सर, अनमोल मेश्राम सर तसेच गावातील ज्येष्ठ नागरीक टेकचंद […]

You May Like

Archives

Categories

Meta