एलसीबी पोलीसानी कांद्री घरफोडीचे दोन आरोपी पकडले

एलसीबी पोलीसानी कांद्री घरफोडीचे दोन आरोपी पकडले. 

#) दोन्ही आरोपीचा ३० जुन पर्यंत पीसीआर. 

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत कांन्द्री बस स्टाॅप येथील पुजा रविंन्द्र पोटभरे यांचा घरी घरफोडी करणारे दोन आरोपीना नागपुर ग्रामिण स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा पोलीसांनी पकडुन कन्हान पोलीसाच्या ताब्यात दिल्याने पुढील कारवाई कन्हान पोलीस करित आहे.  

        प्राप्त माहिती नुसार गुरुवार दि.२४ जुन २०२१ ला रात्री ८ वाजता दरम्यान पुजा रविंन्द्र पोटभरे वय २८ वर्ष राह. कांन्द्री बस स्टाॅप जवळ घरा ला कुलुप लावुन आईच्या घरी गेले असता शुक्रवार दि. २५ जुन २०२१ ला रात्री १० ते ११ वाजता दरम्यान अज्ञात चोरांनी कुलुप तोडुन घराच्या आत प्रवेश करून आलमारी मध्ये ठेवलेले सोने, चांदीचे दागिने एकुण किंमत ६७,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला फिर्यादी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र २२२/२१ कलम ४५४ ४५७ ३८० भादंवि नुसार गुन्हा दाखल असल्याने स्थानिय गुन्हे अन्वेशन नागपुर ग्रामिण चे सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल राऊत सह पोलीस कर्मचा-यांनी यातील आरोपीचा शोध घेत आरोपी १) मोहम्म़द आबीद मोहम्मद खलील व २) फैयाज अब्दुल अजिज हयांना रविवार (दि.२७) ला पकडुन कन्हान पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. सदर कारवाई स्थानिय गुन्हे अन्वेशन नागपुर ग्रामिणचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल राऊत, एएसआय लक्ष्मीकांत दुबे, हे कॉ विनोद, नापेसी प्रणय बनाफर, साहेबराव, शैलेश, भगत सत्या, विरू, दासी आदीने शिताफितीने करून चोरी करणारे दोन आरोपी पकडले.

          कन्हान पोलीसांनी दोन्ही आरोपीना न्यायालयात हजर करून चोरीतील मुद्देमाल न मिळाल्याने व ईतर चोरीत यांचाच हात असल्याची शक्यता वर्तविल्याने या दोन्ही आरोपीचा ३० जुन पर्यंत पेलीस कस्टडी रिमांड (पीसीआर) मिळवुन कन्हान पोलीस निरिक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

निशीखा हेमंत गोखे हीची स्पोर्ट इंडियात निवड

Wed Jun 30 , 2021
  निशीखा हेमंत गोखे हीची स्पोर्ट इंडियात निवड नागपुर : – स्पोर्ट इंडिया उपक्रमा अंतर्गत खेलो इंडिया खेलो मध्ये चौदा ते सोळा वयोगटात बैडमिंटन स्पर्धे करिता कु.निशीखा हेमंत गोखे ही ची निवड करण्यात आली आहे. स्पोर्ट इंडिया उपक्रमा अंतर्गत दि.९ फेबुवारी ते ११ फेब्रुवारी २०२१ ला युनिवर्सिटी ग्राउंड नागपुर येथे […]

You May Like

Archives

Categories

Meta