कन्हान नवीन पुलाचे राज्यमंत्री सुनिल केदार यांनी केली पाहणी

कन्हान नवीन पुलाचे राज्यमंत्री सुनिल केदार यांनी केली पाहणी

#) पुलाचे काम त्वरित करा. जि प अध्यक्षा बर्वे चे राष्ट्रीय महामार्ग विभागीय अभियंताना निवेदन.

#) आज जि प नागपुर येथे संबधित अधिका-यां ची बैठक. 

कन्हान : – राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ येथील कन्हान नदी वर नवीन पुलाचे काम २०१४ ला सुरू झाले. अद्याप पूर्ण न झाल्याने जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागीय अभियंता यांना निवेदन देऊन या पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करून लोकांपर्ण करण्या त यावे. अशी मागणी केल्याने राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सोमवार २३ मे ला दुपारी महामार्गा वरील कन्हान पोलीस स्टेशन ला अधिकाऱ्यांसह पोहचुन पाहणी केली. आणि पुलाचे बांधकाम व बांधकामात दिरंगाई बाबत अधिकाऱ्यां कडून माहिती घेतली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी मंत्री केदार यांना पुलाच्या बांधकामात येणाऱ्या अडचणींची माहि ती दिली. त्यावर केदार यांनी बुधवार (दि.२३) मे ला जि.प. कार्यालयात सर्व संबंधित अधिकारी आणि जि प अध्यक्षा रश्मी बर्वे यांची बैठक आयोजित केली.  बैठकीत बांधकामात येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करून नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा मार्ग निश्चित करण्यात येणार आहे.

           राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ हा देशाचा महत्त्वा चा महामार्ग आहे. कन्हान शहर हे नागपूर शहराच्या अगदी जवळ असुन नागपुर शहर हे देशाच्या मध्यभा गी असल्याने उत्तरेकडील काश्मीर ते दक्षिणेला कन्या कुमारी या दोन देशाच्या टोकाला जोडणारा हा मुख्य महामार्ग असुन कन्हान नदी पुलाच्या मदतीने पुर्ण होतो. कन्हान नदीवरील जुन्या ब्रिटीश कालीन पुला वरून आज ही अवजड वाहतुक सुरु आहे. पुलाचे आयुष्यमान पुर्ण होत १५० वर्ष झाल्यामुळे आणि पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळे २५ फेब्रुवारी २०१४ ला तत्कालीन रस्ते वाहतुक मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांच्या हस्ते नवीन पुलाचे भूुमिपुजन करण्यात आले. ३५.९२ कोटी रुपये निधी खर्चा चे बांधकाम असुन हा पुल ३९०.९५ मीटर लांब ज्याच्या समोर २७.९२५ मीटर लांबी च्या दोन गल्ल्या आहेत. पुलाची रूंदी १४.८० मीटर असुन दोन्ही बाजुला १.५ मीटर फुटपाथ ची तरतुद आणि पुलाची उंची १२१ मीटर असणार आहे.  जुन २०१४ मध्ये नविन पुल बांधकामाचे कंत्राट खरे आणि तारकुंडे कंपनीला देण्यात आले होते. करारा नुसार पुलाचे काम २१ महिन्यात पुर्ण करायचे होते.  मात्र पुलाच्या बांधकामात वारंवार येणारे अडथळे, बांधकामाची संथ गती आदी समस्याने नंतर पुलाचे बांधकाम दुसऱ्या एजन्सीकडे सोपविण्यात आले.  पुलाचे बांधकाम जवळपास पुर्णते कडे होत आहे.  पुलावर पायी जाणाऱ्यांसाठी रेलिंगचे काम दोन्ही बाजुने अद्याप झालेले नाही. नविन पुल बांधकामाला काहीना काही कारणामुळे विलंब करण्यात आल्याने आठ वर्ष लोटुन सुध्दा ये-जा करणाऱ्यास लोकार्पण  न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. २०१७ पासुन सातत्याने या पुलाच्या बांधकामात अडचणी येत असु न आता पुलाचे काम जवळपास पूर्णत्वास आले   

असले तरी या २०२२ मध्ये ही या पुला वरून वाहतुक सुरू होईल की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही.  नागपुर ऑटोमॅटिव्ह चौक ते टेकाडी पर्यंत चारपदरी महामार्ग हा कन्हान पुलाने जोडला जाणार आहे.सध्या नागपुर ते टेकाडी फाटा पर्यंत चारपदरी सिमेंट रस्त्या चे काम बहुतेक पुर्ण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील कन्हान नदीवर निर्माणाधीन नविन पुल किती लवकर पुर्ण होणार आणि कन्हान नदीच्या जर्जर, जुन्या ब्रिटीश कालीन जिर्ण पुलावरून धोका दायक वाहतुक आणि वारंवार बंद होणारे रेल्वे फाटक या पासुन महामार्गा वरील प्रवाशांना कधी सुटका मिळणार आहे. यास्तव जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागीय अभियंता यांना पत्र देऊन या पुलाचे बांधकाम त्वरित पुर्ण करून लोकार्पण करित प्रवाशी व नागरिकांसाठी सुरू करण्यात यावा.  अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.  

       कन्हान नदीवरील नविन पुलाची पाहणी राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हयानी केली असता यावेळी जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष नरेश बर्वे, ग्रा.पं.कांद्री उपस रपंच श्यामकुमार (बबलु) बर्वे, माजी न प उपाध्यक्ष योगेश रंगारी, नगरसेविका रेखा टोहणे, गुंफा तिडके,  नगरसेवक मनिष भिवगडे, सदरे आलम खान, आकिब सिद्दीकी, अजय कापिसकर, सतीश भासरकर, शरद वटकर, चंद्रशेखर बावनकुळे, अमोल प्रसाद, प्रशांत मसार, राहुल टेकाम, गणेश सरोदे, आसिफ सिद्दीकी, कुणाल भडंग, सुरज गणराज सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कंटेनर ट्रक ने दुचाकी वाहनास जोरदार धडक, दुचाकी चालकांचा घटनास्थळीच मुत्यु

Tue May 24 , 2022
कंटेनर ट्रक ने दुचाकी वाहनास जोरदार धडक, दुचाकी चालकांचा घटनास्थळीच मुत्यु कन्हान : – परिसरातील गहुहिवरा रोड अंडर पुला जवळ एका कंटेनर ट्रक चालकाने दुचाकी वाहन ला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक सतिश श्रोते चा घटस्थळीच मृत्यु झाल्या ने कन्हान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी ट्रक चालकास […]

You May Like

Archives

Categories

Meta