खिडकी लावण्याचा वादातून चाकू हल्ला

खिडकी लावण्याचा वादातून चाकू हल्ला

कन्हान,ता.०६ जून

    कांद्री वॉर्ड क्रमांक एक येथे खिड़की लावण्याचा वादातून आरोपी मनोज भोले याने सुरेश सहारे याच्यावर चाकूने हल्ला केला. यात युवक गंभीर जखमी झाला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कांन्द्री येथील सूर्यभान उमराव गायधने यांचे घर बांधण्याचा कंत्राट सुरेश नानाजी सहारे यांनी घेतले आहे. या ठिकाणी २० दिवसापासून घर बांधण्याचे काम सुरू आहे. सुरेश सहारे व कामगार घराची खिडकी लावत होते. तेव्हा सुरेश सहारे यांना घरमालकाच्या घराच्या बाजूला राहत असलेल्या मनोज भोले यांनी खिडकी लावू नये म्हणून हटकले. दरम्यान सुरेश सहारे यांनी घरमालकाला फोन लावण्यासाठी घराबाहेर निघाले असता मनोज भोले याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यात सुरेश जखमी झाले. याप्रकरणी मनोज भोले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता कधी मिळणार? शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पदरी निराशाच

Tue Jun 6 , 2023
सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता कधी मिळणार? शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पदरी निराशाच   कन्हान, ता. ६    राज्य : शासनातील इतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते मिळाले. मात्र, शिक्षकांनी निधी अभावा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळाली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे.     राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग […]

You May Like

Archives

Categories

Meta