निशीखा हेमंत गोखे हीची स्पोर्ट इंडियात निवड

 

निशीखा हेमंत गोखे हीची स्पोर्ट इंडियात निवड

नागपुर : – स्पोर्ट इंडिया उपक्रमा अंतर्गत खेलो इंडिया खेलो मध्ये चौदा ते सोळा वयोगटात बैडमिंटन स्पर्धे करिता कु.निशीखा हेमंत गोखे ही ची निवड करण्यात आली आहे.
स्पोर्ट इंडिया उपक्रमा अंतर्गत दि.९ फेबुवारी ते ११ फेब्रुवारी २०२१ ला युनिवर्सिटी ग्राउंड नागपुर येथे स्पर्धा चाचणी आयोजित करण्यात आली होती. खेलो इंडिया खेलो मध्ये कु.निशीखा हेमंत गोखे हीची चौदा ते सोळा वयोगटात बैडमिंटन स्पर्धे करिता निवड करण्यात आली आहे. डी.डी. नगर शाळेचा माजी विद्यार्थी यांनी कु निशीखा गोखे यांच्या घरी जाऊन निवड झाल्या बद्दल कु.निशिखा हीला पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून भविष्याच्या वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी शिव छत्रपती पुरस्कार विजेते सुनिल सरोते, जगदीश ठवरे, विशाल मानापूरे, निलेश आंबीलवादे, अभय दुरटकर व सुनिल पराते उपस्थित होते. निशीखा गोखे हीने यांचे श्रेय आपल्या आई-वडील व मार्गदर्शक शिक्षकाला दिले. आणि प्रोत्साहित केल्याबद्दल सर्वाचे आभार व्यकत केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

आदर्श हायस्कुल कन्हान व्दारे वृक्षरोपन

Thu Jul 1 , 2021
आदर्श हायस्कुल कन्हान व्दारे वृक्षरोपन कन्हान : – कोव्हीड- १९ प्रादुर्भाव लक्षात घेत शैक्षणि क सत्र २०२१-२२ सुरू करण्यात आले असल्याने आदर्श हायस्कुल कन्हान येथील शाळेच्या पटागंणात संचालन मंडळाच्या अध्यक्षा व सचिव हयांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. आयडियल एज्युकेशन सोसायटी कन्हान व्दारे संचालित आदर्श हायस्कुल (हिंदी माध्यम) कन्हान व्दारे शैक्षणिक सत्र […]

You May Like

Archives

Categories

Meta