केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी येथे कोरोना चा उद्रेक : विद्यालयात केली तपासणी व उपचार

*केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी येथे कोरोना चा उद्रेक*

#) *१७५लोकांची चाचणीत १७ विद्यार्थी, ७ कर्मचारी व त्यांचे परिवार निघाले कोरोना बाधित*.

#)*प्राथामिक आरोग्य केन्द नवेगाव खैरी चे डाक्टर व टीम ने नवोदय विद्यालयात केली तपासणी व उपचार*.

#) *पालकांच्या शाळा प्रशासन वर रोष*.

कमलसिहं यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी

*पारशिवनी*(ता प्र): -पाराशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थी सह शिक्षक, कर्मचारी व त्यांचे परिवारास मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्या ने तपासणी अहवालात समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांकडे धाव घेऊन शाळा प्रशासना वर रोष व्यक्त करीत आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्याचा आग्रह धरला. पण कोरोना युनिटचे डॉक्टर,व नवेगाव खैरी केन्दा चे डाक्टर यांनी पालकांची समजुत काढली.
कोरोणा महामारी संकटातुन आपले कुटुंब, गाव, शहर, राज्य व देश सुरक्षित राहावा याकरीता शासन वेळोवेळी लाकडाऊन करून शाळा विद्यालय बंद करण्याचा आदेश देऊन नागरिकांना कोरोना पासून सुरक्षित राहण्याकरिता मार्गदर्शन व सुचना देत असून गर्दी करू नका, गर्दीत जाऊ नका, नेहमी हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा, लक्षणे दिसल्यास वेळेवर तपास णी, औषध उपचार घ्या असा प्रकारे जनजागृती करू नही कोरोना संक्रमण वाढत आहे. शासनच्या आदेशा ची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे असले तरी स्थानिक पातळीवर या सर्व नियमांना तिलांजली देऊन नागरिक बिनधास्त वागत असल्याने आज कोरोना झपाट्याने आपले हात पाय ग्रामीण व शहरी भागात पसरवित आहे. आज ही नागरिक कोरोना विषाणु आजाराला हलक्यात घेत असुन कोरोना तपासणी, लस घेण्यास शासनास पाहीजे तसे प्रतिसाद देत नस ल्याने कोरोना रूग्णाची लागण दिवसेदिवस वाढत आहे. नागरिकांनी, शासन, प्रशासन व आरोग्य विभागास प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यास वेळोवेळी सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असुन या माहामारी वर प्रतिबंध लावण्यास महत्वाचे आहे .
मंगळवार (दि. ८) मार्च जागतिक महीला दिनी नवेगाव खैरी च्या जवाहर नवोदय विद्यालयात शिकत असलेले १७ विद्यार्थी, ७ पेक्षा अधिक शिक्षक व कर्मचारी परिवारां चे सदस्य कोरोना बाधित तपासणी अंती कळल्याने सदर विद्यालय कोरोना केंद्र बनले असल्याची भीती व्यकत होत. केंद्रीय नवोदय विद्यालयात विद्यार्थी निवासी राहुन शिक्षण घेत असल्याने पारशिवनी तालुका तिल प्राथमीक आरोग्य केन्द्र नवेगाव खैरी केंद्राचे डॉ रवी शेंडे आणि प्रा आ केन्द्र नवेगाव खेरी चे श्री पाटील ,श्री मडावी, पवार मॅडम, श्री मोहन डोणारकर, मोहासिन शेख व प्राथमिक आराोग्य केन्द्र नवेगाव खैरी ची चमुनी नवोदय विद्यालयात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व परिवारातील अंदाजे १७५ लोकांची कोरोना चाचणी केली असता विद्यालयात कोरोना उद्रेक झाल्याचे पालकांना कळताच त्यांनी धाव घेत आपल्या रोष शाळा प्रशासन वर व्यक्त करू न आपल्या मुलांना घरी घेऊन जाण्याची मागणी केली . तेव्हा डॉक्टरांनी पालकांशी संवाद साधुन त्यांना सांगितले की आपण पालक मुलांना घरी नेल्यास परि वाराला सुद्धा लागण होणार हा धोका टाळण्यासाठी आम्ही सर्व बाधितांना विद्यालयातच कोरंटाईन करून योग्य औषधोपचार करणार आहोत. पाच दिवसांनी पुन्हा कोरोना तपासणी करू त्यात संख्या कमी होईल. पुर्ण कोरोना मुक्त झाल्यावर आपण मुलांना आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. अश्या पध्दतीने डॉक्टरांनी पालकांची समजुत काढुन त्यांना शांत केले.
डॉ. प्रशांत वाघ तालुका वैद्यकीय अधिकारी कोविड -१९ प्रमुखडॉतारिकअन्सारी ,प्राथमिक आरोग्य केन्द्र नवेगाव खैरी चे वैद्यकिय अधिकारी डॉः रवी शेडें सर यांनी कोरोना संक्रमण पासुन आपल्या व कुटुंबाच्या बचाव करण्यासाठी शासनाच्या प्रतिबंधात्माक उपाय योजना, नियमांचे काटेकोर पालन करून गर्दी करू नका, मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा, दोन व्यकतीत अंतर ठेवा, लक्षणे दिसल्यास तपासणी व उपचार करा. असे नागरिकांना आवाहन केले आहे.
तालुका चे पाच ही प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय पार शिवनी येथे कोरोना प्रतिबंधक म्हणुन ६० वर्षांपेक्षा अधिक स्त्री-पुरुषाना लस देणे शुरू आहे. त्यांनी आपला आधार कार्ड व मोबाईल क्रमांक सह जाऊन लस घ्यावी. तसेच ४० वर्षाच्या वरील स्त्री-पुरुष गंभीर आजार अस ल्यास, उपचार करीत असेल त्यांनी सोबत डॉक्टरांचे प्रमाणपत्र व आधार कार्ड, मोबाईल नंबर सह घेऊन जाऊन लस घ्यावी. कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पारशिवनी तालुका वैद्याकेय आधिकारी डॉक्टर प्रशांत वाघ, कोविड -१९ प्रमुख डॉ तारिक अन्सारी ,प्राथमिक आरोग्य केन्द्र नवेगाव खैरी चे वैद्यकिय अधिकारी डॉः रवी शेडें सर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहर विकास मंच द्वारे सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी

Wed Mar 10 , 2021
कन्हान शहर विकास मंच द्वारे सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी #) हनुमान मंदिर, गांधी चौक कन्हान येथे कार्यक्रमाचे आयोजन.  कन्हान : – सावित्रीबाई फुले यांचा पुण्यतिथी निमित्य  हनुमान मंदिर, गांधी चौक कन्हान येथे कन्हान विकास मंच व्दारे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण , पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून सावित्री बाई फुले […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta