निलज सरपंचा, ग्रामसेवक, रोजगार सेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करा- ग्रामस्थांची मागणी मनरेगा योजनेत अनियमिता व भ्रष्टाचार केल्याचा आरोप.

निलज सरपंचा, ग्रामसेवक, रोजगार सेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करा- ग्रामस्थांची मागणी

मनरेगा योजनेत अनियमिता व भ्रष्टाचार केल्याचा आरोप.

कन्हान,ता.02 ऑक्टोबर

    निलज ग्राम पंचायत मध्ये सरपंचा आशा ताई पाहुणे यांनी आपल्या मुलास कार्यालयीन शिपाई व उपसरपंच पंकज टोहने यांनी भावास पाणी पुरवठा शिपाई पद्दी नियम बाहय नियुक्ती केली. ग्रामसेवकांने शासन निर्णयाचे अधिन सभेत योग्य मार्गदर्शन न केल्याने संतप्त गावक-यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी पारशीवनी यांना निलज सरपंचा, ग्रामसेवक, रोजगार सेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून  केली आहे.

      ग्राम पंचायत निलज गाव विरोधी पक्ष गट नेते जि.प सदस्य व्यंकटेश कारेमोरे यांचे गाव असुन गेल्या दहा वर्षापासुन ग्राम पंचायतीवर त्यांचा पक्षाचे वर्चस्व आहे. परंतु आता निलज गावातील ग्रामस्थांचा मनात चीड निर्माण झालेली आहे. (ता.२३) ऑक्टोंबर २०२० रोजी ग्राम पंचायत निलज येथे कार्यालयीन शिपाई व पाणी पुरवठा शिपाई म्हणुन तत्कालीन ग्राम पंचायत सदस्या व विद्यमान सरपंचा आशाताई मोरेश्वर पाहुणे यांनी आपला मुलगा रोमन पाहुणे यास कार्यालयीन शिपाई व उपसरपंच पंकज टोहणे नी आपल्या भावाला पाणी पुरवठा शिपाई म्हणुन नियुक्त केले होते. या वेळी एकुण १५ अर्जदारांनी शिपाई पदाकरिता अर्ज केले होते. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता ग्राम पंचायत शिपाई नियुक्ती प्रक्रिया पुर्ण करण्यात आल्याने संत्पत अर्जदारांनी गट विकास अधिकारी पारशीवनी यांना या विषयी तक्रार केल्याने तत्कालीन गट विकास अधिकारी खाडे यांनी चौकशीचे आदेश देत मनोजकुमार सहारे विस्तार अधिकारी प.स.पारशीवनी यांची चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्ती केली होती. सहारे यांनी आपल्या चौकशी अहवालात मुंबई ग्राम पंचायत नौकरां बाबत (सेवा प्रवेश आणि सेवेचा शर्ती) नियम १९६० पोट नियम ४ व ४-अ- २ अन्वये भर्ती प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु महाराष्ट्र शासन सामन्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रा नि म/१२१५ /(प्र.क्र.१०९ / १५)/१३ – अ दि.५ ऑक्टोम्बर २०१५ मधील परिच्छेद २ व ३ अन्वये शासन निर्णयानुसार कर्मचारी भर्ती प्रक्रिया नियमा नुसार पार पाडली नाही. शासन निर्णया चे अधिन राहुन सचिवाने सभेत योग्य मार्गदर्शन केले नाही. त्या अनुषंगाने झालेली भर्ती प्रक्रिया नियम बाह्य ठरते असे स्पष्ट चौकशी अहवालात नमुद केले. सदर प्रक्रियेवर तत्कालीन गट विकास अधिकारी अशोक खाडे यांनी स्थगिती दिली. परंतु तत्कालीन चौकशी अधिकारी सहारे यांच्यावर जि.प. सदस्य व्यंकट कारेमोरे यांनी राजकीय दबाव आणुन सदर प्रकरण थंड बस्त्यात ठेवलं आणि साहारे यांना दुसऱ्या जि.प.क्षेत्रात बदली केल्याने त्या कर्मचाऱ्यांना आजपावत पदावरून काढण्यात आले नाही. त्यामुळे अर्जदारांना न्याय कधी मिळणार? असा सवाल गावक-यांनी केला. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत अनियमिता व मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता रविन्द्र चकोले व गावक-यांनी करित दोषिवर कारवाई करण्याची मागणी तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदन द्वारे करण्यात आली आहे.  जे कधी रोजगार हमी च्या कामावर जात नाही. अशा लोकांचा खात्यात पैसे जमा होत आहे. एकुण सात लाखाच्या जवळ मनरेगा मध्ये भ्रष्टाचार असल्याचे पुराव्या सहीत आरोप करत दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.  कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता चौकशी करावी. असे निवेदन रविन्द्र चकोले, प्रदीप चकोले, दीपक भुते, अशोक हटवार, रामचंद्र चकोले, राजेंद्र चांदेमेश्राम, भरत चकोले, तंटा मुक्ती अध्यक्ष शेषराव चकोले, ग्रा.प. सदस्य धनराज चकोले सह गावक-यांनी देत मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

धर्मराज प्राथमिक शाळेत "एक दिवा लेकीसाठी" हा उपक्रम साजरा

Sun Oct 2 , 2022
धर्मराज प्राथमिक शाळेत “एक दिवा लेकीसाठी” हा उपक्रम साजरा कन्हान,ता.02 ऑक्टोबर      स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असला तरी मुलीच्या शिक्षणाला गती मिळाली नाही. मुलगा मुलगी हा भेद न करता सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत करा, असे आवाहन उपनगराध्यक्ष योगेश रंगारी यांनी केले.     धर्मराज प्राथमिक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta