“कलंक” शब्दप्रयोग केल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक ठाकरे विरुद्ध कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा आरोप

“कलंक” शब्दप्रयोग केल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक
ठाकरे विरुद्ध कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा आरोप

कन्हान,ता.१२ जुलै
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कलंक शब्दप्रयोग केल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध तारसा रोड, चौकात भाजपच्यावतीने नारे लाऊन निषेध आंदोलन करण्यात आले.


उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसैनिकांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीना उद्देशून “नागपूरचा कलंक” असा शब्दप्रयोग केला होता. ठाकरेंच्या अभ्रद भाषेमुळे भाजपच्या कार्यकर्ते व सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कर्तुतवान नेत्या बद्दल हीन वक्तव्य करने, उद्वव ठाकरे यांना अशोभनीय आहे. असे उपस्थित वक्त्यांनी आपले मत वक्त केले.


प्रसंगी भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक, भाजपा तालुका अध्यक्ष अतुल हजारे, भाजपा जिल्हा ओबीसी महामंत्री रामभाऊ दीवटे, भाजपा नेते योगेश वाड़ीभस्में, भाजपा महामंत्री कन्हान सुनील लाडेकर, जिल्हा अनु:जाती मोर्चा महामंत्री रिंकेश चवरे, भाजपा तालुका संपर्क प्रमुख शैलेश शेळके, भाजपा युवा मोर्चा सौरभ पोटभरे, भाजपा नेते रानू शाही, युवा मोर्चा कन्हान अध्यक्ष विक्की सोलंकी, भाजपा कन्हान अनु:जाती अध्यक्ष संजय रंगारी, मनोज कुरडकर, भाजपा अनु:जाती मोर्चा महामंत्री अजय लोंढे, अनु:जाती मोर्चा महामंत्री मयूर माटे, भाजपा कन्हान शहर प्रसिद्धि प्रमुख ऋषभ बावनकर ,कांद्री शहर अध्यक्ष गुरूदेव चकोले, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

खंडाळा येथे गुरुपुजा व शाहीर कलाकार मेळावा 

Thu Jul 13 , 2023
खंडाळा येथे गुरुपुजा व शाहीर कलाकार मेळावा कन्हान,ता. १२ जुलै    कन्हान शहर परिसरातील खंडाळा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील (दि.‌९) जुलै रोजी गुरुपूजा व शाहीर कलाकार मेळावा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.     गुरुपुजेला कार्यक्रमाचे उद्घाटन व‌ दिप प्रज्वलन माजी आमदार राजेंद्र मुळक यांचे हस्ते करण्यात आले. युवा शाहीर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta