मोहफुलाच्या हाथभट्टीवर धाड ,१लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त : पोलिसांची कारवाई

पारशिवनी पोलीसानी मोहफुलाच्या हाथभट्टीवर धाड मारून १लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पारशिवनी ( कन्हान ) : – पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा बनेरा टोली शेतशिवारात पारशिवनी पोलीसांनी चालु मोहाफुलाच्या दारू हाथभट्टीवर धाड मारून दोन आरोपींना पकडुन त्याच्या ताब्यातील एकुण १ लाख १८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.०४) मे २०२१ ला दुपारी ३:१० ते ४:०० वाजता दरम्यान बनेरा टोली शेतशिवारात दोन आरोपी मोहाफुल दारू गाळण्याचे चालु हातभट्टीवर पारशिवनी पोलीसांनी सहकारी कर्मचारी व पंचा सह धाड मारली असता आरोपी १) रमेश शालीक कोरचे वय ३८ वर्ष रा. बनेरा टोली, पार शिवनी २) रविंन्द्र फजीतराव मडावी वय २९ वर्ष रा. बनेरा टोली पारशिवनी हे अवैधरित्या तिन दगडांचे चुलीवर लाकडे पेटवुन त्यावर लोखंडी ड्रम व जर्मन पातेले ठेवून स्टिलच्या चाळणी द्वारे प्लांस्टीकच्या कॅन मध्ये मोहाफुल दारु गाळतांना मिळुन आल्याने दोन आरोपींला पकडुन त्यांच्या ताब्यातील दोन काळ्या रंगाचे रबरी ट्युबमध्ये प्रत्येकी ५० लीटर प्रमाणे एकुण १०० लीटर मोहाफुल दारू किंमत ५०,००० रुपये, २) एक पांढ-या रंगाच्या प्लाॅस्टीक कॅन मध्ये १० लीटर गरम मोहाफुल दारू किंमत ५,००० रुपये, ३) जमीनी तील दोन खड्यामध्ये प्लाॅस्टीक पाॅलीथिन अंथरून त्यामध्ये भिजत घातलेला २०० ली. मोहाफुल सड़वा किंमत ४०,००० रुपये, ४) हातभट्टीच्या चुलीवर ठेवले ल्या लोखंडी ड्राम मधील प्रत्येकी १०० लीटर मोहफुल सड़वा किंमत २०,००० रुपये, ५) एक मोठा लोखंडी ड्रम किंमत १००० रुपये, ६) एक मोठे जर्मनी पातेले किंमत १००० रुपये, ७) दोन टिनाचे पिंप किंमत २०० रूपये, ८) मोहफुल दारू गाळण्याची एक स्टिलची चाळणी किंमत ३०० रूपये, ९) एक सुती नेवार पट्टी किंमत ५० रूपये १०) दोन मन जळाऊ लाकडे किंमत ४०० रूपये, ११) एक हिरव्या रंगाची प्लाॅस्टीकची नळी किंमत ५० रूपये, १२) हातभट्टी वरील चुलीचे टीन दगड किंमत ०० रूपये असा एकुण किंमत १ लाख १८ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून सरका र तर्फे फिर्यादी पारशिवनी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक संदीपान उबाळे यांच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध अप क्र १००/२१ कलम ६५ (ई)(एफ)(सी), ८३ म.दा.का नुसार गुन्हा दाखल करून कारवाई केली. पारशिवनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांचा मार्गदर्शनात पोउपनि संदीपान उबाळे, परी. पोउपनि हेंमत सोनकुसरे पोना संदीप कडु, मुद्देसर जमाल, महेंद्र जळीतकर हयानी शिताफीतीने कारवाई करून पुढील तपास पारशिवनी पोलीस करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नयाकुंड वळणा वर वारंवार अपघात राज्यमार्ग अधिका-यांच्या दुर्लक्षतेचा आरोप

Thu May 6 , 2021
*राज्यमार्ग अधिका-यांच्या दुर्लक्षतेने नयाकुंड वळणा वर वारंवार अपघात.नयाकुंड वळणावर कांद्याचा ट्रक पलटला. चालक व क्लीनर चा जिव वाचला*. पारशिवनी (कन्हान) : – आमडी फाटा ते पारशिवनी दोन पदरी सिमेंट रस्त्यावरील पेंच नदी काठावर नयाकुंड गावाजवळील रस्त्यावर एल वळणावर सुचना फलक, गतिरोधक, रस्ता दुभाजक नसल्याने चालकांचे वाहनावरील संतुलन बिघडुन अपघाताचे प्रमाण […]

You May Like

Archives

Categories

Meta