अंगणवाडी सेविकांनी केले मोबाईल परत
कन्हान,ता.०२ फेब्रुवारी
तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारशिवनी येथे तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांनी मोबाईल कार्यालयात जमा करून परत केले.
अंगणवाडी संघटनेच्या ज्योती अंडरसाहारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुक्यातील अंगणवाडी नेत्या सुनिता मानकर, उषाताई सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारशिवनी तालुक्याच्या चार ही केंद्राच्या अंगणवाडी सेविकांना मिळालेले मोबाईल एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रक्रल्य कार्यालयात जमा करून परत केले. यात तालुक्यातील चार केंद्रातील कन्हान केंद्र एकुण २६ पैकी १४, दहेगाव (जोशी) केंद्र २९ पैकीं २२, डोरली केंद्र २८ पैकीं २४, नवेगाव (खैरी) केंद्र ३७ पैकी २४ असे अंगणवाडी सेविकांनी एकुण ८४ मोबाईल जमा करून परत केले. यापुर्वी ३१ मोबाईल खराब झाल्याने आधीच कार्यालयात जमा केले आहे. असे एकुण ११५ मोबाईल कार्यालयात जमा झाले असून दोन मोबाईल हरविलेले आहे. संपुर्ण मोबाईल पैकीं चार अंगणवाडी सेविका उपस्थित नसल्यामुळे त्याचे मोबाईल जमा होऊ शकले नाही. चार ही केंद्राच्या एकुण १२१ मोबाईल पैकी ८४ मोबाईल केंद्रा प्रमाणे पँकींग करून कार्यालयात जमा करून परत केल्याची माहीती अंगणवाडी सेविकांच्या तालुका नेत्या सुनिता मानकर यांनी माहीती दिली.
प्रसंगी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पारशिवनी तालुका कार्यालयात अंगणवाडी सेविका दुर्गा मोटघरे, माया कटारे, मालाताई खोब्रागडे, कविता श्रीवास्तव, कुंदा रंगारी, विजया मानकर, इंदुबाई नागपुरे, लता रोकडे सह चार ही सर्कलच्या अंगणवाडी सेविका प्रामुख्याने उपस्थित होत्या.
Post Views: 156