शहर विकास मंच व्दारे साखळी उपोषणाला समर्थन

शहर विकास मंच व्दारे साखळी उपोषणाला समर्थन

कन्हान,ता.२९ डिसेंबर

    शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीची संपुर्ण १८.७८ एकड जागा ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कार्या आणि मुलभुत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटनेच्या वतीने २२ डिसेंबर पासुन कन्हान-पिपरी नगरपरिषद कार्यालय सामोर सुरू असलेले साखळी उपोषण हे कन्हान शहराच्या विकासारिता असल्याने तसेच या जागेनंतर शहरात आवश्य क मुलभुत गरजा पुर्ण करण्यास कुठलिही जागा नसल्याने शासनाने ही जागा शहराच्या विकासात्मक कामाकरिता उपलब्ध करून देण्यास कन्हान शहर विकास मंच पुरेपुर समर्थन करित आहे.

      मागील अनेक वर्षापासुन अनेक राजकीय आणि विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यानी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन हिंदुस्तान लिव्हर कंपनी च्या निकामी जमीनीवर मार्केट यार्ड, हाॅकर्स झोन, साप्ताहिक व गुजरी बाजार, भाजीपाला विक्रेता दुका नदार, बस स्टैंड आणि शहराच्या सर्वांगीण विकासा करिता उपयोगात घेण्याची मागणी केली होती. परंतु नगरपरिषद प्रशासनाने मुंग गिळुन या विषयाकडे गां भीर्याने लक्ष केंन्द्रीत न केल्याने हिंदुस्तान लिव्हर कंप नीची जमीन ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कार्यावर प्रश्न निर्माण झाले आहे. हिंदुस्तान लिव्हर लिव्हर कंपनीची जागा शहराच्या सर्वांगीण विकासा आणि मुलभुत सुविधा उपलब्ध करण्याकरिता अति आवश्यक असल्याने कन्हान शहर विकास मंच व्दारे मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालय समोर सुरु असलेल्या साखळी उपोषणाला भेट देऊन कन्हान-कांद्री दुकानदार महासंघ अध्यक्ष अकरम कुरैशी यांना समर्थन पत्र देऊन साखळी उपोषणाला पांठिबा दिला आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, कोषाध्यक्ष भुषत खंते, प्रभाकर रुंघे, भरत सावळे, हरीओम प्रकाश नारायण, विनोद खडसे, निलेश शेळके, चिराल वैध, प्रशांत पाटील सह मंच पदाधिका री प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोल वॉशरीत महाजनको च्या वॉशिंग कोळश्यात मध्यप्रदेशातील वेस्ट कोल मिलावट करण्या-यावर कारवाई करा - प्रशांत पवार  भेसळ कोळश्यामुळे राज्याला जास्त दराने विद्युत पुरवठा 

Wed Dec 28 , 2022
  कोल वॉशरीत महाजनको च्या वॉशिंग कोळश्यात मध्यप्रदेशातील वेस्ट कोल मिलावट करण्या-यावर कारवाई करा – प्रशांत पवार भेसळ कोळश्यामुळे राज्याला जास्त दराने विद्युत पुरवठा कन्हान,ता.२८ डिसेंबर (सुनिल सरोदे)       मौजा एंसबा (वराडा) स्थित महा मिनरल माइनिंग एंड बेनिफिशिएशन प्रा.लि. च्या कोल वॉशरी मध्ये मध्यप्रदेशातील गाडरवारा च्या पॉवर प्लांट […]

You May Like

Archives

Categories

Meta