टेकाडी येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा हस्ते ध्वजारोहण
कन्हान, ता.15 ऑगस्ट
75 व्या गणतंत्र दिवसानिमित्त गेल्या तीन दिवसापासून अमृत महोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात होता. यामध्ये समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित ‘राजे फाउंडेशन कन्हान’ यांच्यामार्फत तिरंगा रॅली व झेंडावंदन घेण्यात आले. या सोबतच शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना बूट वाटप करण्यात आले. संस्थेचे ध्वजारोहण कार्यालय समोर महात्मा फुले चौक, टेकाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा हस्ते ध्वजारोहण व सत्कार करण्यात आला. बारावी मध्ये मधुरा बोराडे शाखा विज्ञान, अनिकेत निमजे शाखा विज्ञान, पूजा कांबळे शाखा कला, यश बोबडे शाखा वाणिज्य, खुशी दहीकर तसेच दहावी श्रेया मोरे, जानवी कुरडकर, तन्वी कावलकर आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नादब्रह्म ग्रुप, टेकाडी यांच्याकडून देश भक्ती संगीतमय कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. यावेळी संस्थेचे एक वादळ लीडर छकुली वासाडे, अध्यक्ष निलेश गाढवे, राजे फाउंडेशनचे अध्यक्ष केतन भिवगडे, परमात्मा एक दानपट्टा मर्दानी आखाडा वस्ताद मोहन वकलकर, अमृता टाकळखेडे, देवानंद बोराडे, सुरेंद्र राऊत, प्रभाकर बोराडे, सुरेश खोरे, उद्धवजी निमकर व समस्त गावकरी उपस्थित होते.
Post Views: 854