स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीराने साजरा 

 

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीराने साजरा

कन्हान, ता.15 ऑगस्ट

  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीराने साजरा  १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवा निमित्य विदर्भ भुमिपुत्र संघटन व्दारे तारसा रोड चौक महाकाली कॉम्पलेक्स कन्हान येथे भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीरात ५९ रक्त दात्यांनी रक्तदान व ७३ नागरिकांनी बुस्टर डोज घेत लाभ घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

      सोमवार (दि.१५) ऑगस्ट २०२२ ला सकाळी १०.३० वाजता तारसा रोड चौक महाकाली कॉम्पलेक्स कन्हान येथे आयोजित भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीराचे विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान व्दारे आयोजन करून नगराध्यक्षा सौ. करूणाताई आष्टणकर यांचे हस्ते उद्घाटन करून सुरूवात करण्यात आली. शिबीरास इंदिरा गांधी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय रक्तपेढी नागपुर व प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या डॉक्टर सह चंमुच्या सहकार्याने कन्हान परिसरातील ५९ रक्तदात्यानी रक्तदान केले तर १८ वर्षावरील ७३ नागरिकांनी बुस्टर डोज घेत लाभ घेऊन ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. तसेच तपस्या फाऊंडेशन रामटेक, एम.सी.एम. संविधानिक हक्क संघटन कन्हान, शिवराय ग्रुप खंडाळा यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबीरास मा. प्रशांत सांगोडे तहसिलदार पारशिवनी सह रामटेक विधान सभा क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. भव्य रक्दान व बुस्टर डोज शिबीराचे आयोजक विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर यांनी तर संयोजक रजनीश मेश्राम, समशेर पुरवले, सुनिल लक्षणे, हरीश तिडके, भरत चकोले, राम भैया थदानी, दीपक कुंभल कर, प्रदीप गायकवाड, आशिष वानखेडे, मयुर माटे,  कैलास भाऊ बिरो, सुकलाल यादव, सरिताताई बिरो,  आशिष देशमुख, प्रमोद मोहतकर, राधेश्याम राऊत,  श्रीकृष्ण माकडे, गुड्डा सूर्यवंशी, पवन ठाकुर, मंगेश धोटे आदी सह युवक, शहरवासीयांनी शिबीराच्या यशस्विते करिता परिश्रम घेतले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहर विकास मंच द्वारे स्वातंत्र्य दिनी महापुरुषांना अभिवादन

Wed Aug 17 , 2022
  कन्हान शहर विकास मंच द्वारे स्वातंत्र्य दिनी महापुरुषांना अभिवादन कन्हान,ता.15 ऑगस्ट        कन्हान शहर विकास मंच द्वारे 75 व्या स्वातंत्र्य दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे व मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर यांच्या हस्ते  महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta