युवकाने शेतातील पेरूच्या झाडा गळफास लावुन केली आत्महत्या

युवकाने शेतातील पेरूच्या झाडा गळफास लावुन केली आत्महत्या

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा गोडेगांव शिवारात गजराज कश्यप यांच्या शेतात पेरू च्या बगिच्यात जाऊन पेरू (जांबाच्या) झाडाच्या फांदीला दुपटयाच्या साहाय्याने गळफास घेऊन स्वत: ची जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली. अरविंद अदालत निषांद असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक अरविंद अदालत निषांद वय २५ वर्ष राह. नवाचक जि. गोरखपुर ़(उ. प्र) हल्ली कोळसा खदान नं ६ गोरखपुर दफाई येथील रघुराई यांचे घरी भाडयाने राहत होता. तो कोळसा खदान ला लागुन असलेल्या गोंडेगाव शिवारात गुरूवार (दि.६) जानेवारी च्या रात्री गजराज कश्यप यांच्या पेरू (जांबा) च्या बगिच्यात जाऊन पेरूच्या झाडा च्या फांदीला दुपटा बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि.७) ला सकाळी १० वाजता फोन वर माहीती मिळाल्याने ते जावुन पाहीले असता अरविद गळफास लावुन मुत दिसला. घटनास्थळी कन्हान पोलीस पोहचली होती. फिर्यादी रामआशिष नंदलाल केवट वय ३२ वर्ष राह. कोळसा खदान नं ६ गोरखपुर दफाई यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशनचे थानेदार विलास काळे, पोउपनि जावेद शेख यांनी ताफ्या सह घटनास्थळी जाऊन मौका चौकशी करून घटनेचा पंचनामा केला आणि मृुत्युदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना साठी ग्रामीण रुग्णालय कामठी येथे हलविण्यात आला. शवविच्छेदन करून मृत्युंदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला. मुत्युचे कारण अद्याप कळले नसुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्ग दर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी *ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन थाटात साजरा

Sat Jan 8 , 2022
*आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी *ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन थाटात साजरा कन्हान : – आद्य “दर्पण ” मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमीत्य तेली समाज भवन संताजी नगर येथे (दि.६) जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी 7 वाजता ग्रामिण पत्रकार संघ कन्हान वतीने पत्रकार दिन थाटात पार पडला. मराठी […]

You May Like

Archives

Categories

Meta