कन्हान परिसरातील विविध मांगण्याकरिता रस्ता रोको आंदोलन – माजी आमदार रेड्डी

कन्हान परिसरातील विविध मांगण्याकरिता रस्ता रोको आंदोलन – माजी आमदार रेड्डी

#) सोमवार (दि.२०) डिसेंबर ला तारसा रोड टी पाॅईंट चौक कन्हान येथे रस्ता रोको आंदोलन.

कन्हान : – परिसरातील कन्हान, कांद्री, टेकाडी, गोंडे गाव, वराडा येथील जनहिताच्या विविध मांगण्या करि ता तारसा रोड टी पाॅईंट चौक कन्हान येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असुन परिसरातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य करावे. असे जाहीर आवाहन रामटेक क्षेत्राचे माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
शनिवार (दि.१८) डिसेंबर २०२१ ला सायंकाळी ६ वाजता रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री डी मल्लीकार्जुन रेड्डी यांनी श्री जयराम मेहरकुळे माजी सरपंच यांचे कार्यालय जे एन रोड कांद्री-कन्हान येथे पत्रकार परिषदेत परिसरातील कन्हान, कांद्री, टेकाडी, गोंडेगाव, एंसबा, वराडा येथील जनहिताच्या विविध मांगण्या प्रामुख्याने १) कन्हान कांद्री क्षेत्रात राज्याचे मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांनी नवीन उद्योग सुरू करावे. स्थानिय क्षेत्राचे खासदार, आमदार, नग राध्यक्षा हे एकाच पक्षाचे असुन कन्हान क्षेत्राच्या उद्योगाला गती मिळवुन येथील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. २) मागील आठ वर्षापासुन मंद गतीने कन्हान नदीवर सुरू अस लेल्या मोठा पुल व पोच रस्ता बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावा. ३) नागपुर ते कन्हान कांद्री मेट्रो- २ मंजुर करून लवकरात लवकर काम सुरू करावे.४) कन्हान तारसा रोड वर रेल्वे उडाण पुलाचे काम तातडीने पुर्ण करून नागरिकांना होत असलेल्या त्रासा पासुन दिलासा द्यावा. ५) कन्हान नगरपरिषद क्षेत्राचे नवीन विकास प्राधिकरण प्रस्ताव राज्य शासन नगर विकासचे कामे प्रलंबित असुन जन सुविधाचे कामे रखडलेले असुन नवीन उपजिल्हा रुग्णालय, बस स्टँड, पोलीस स्टेशन, खेळाचे मैदान, साप्ताहिक बाजारपेठ व्यवस्था, नवीन बागबगीचे- उद्यान, शाळेची इमारत आदी सोयीसुविधा सध्या होत नसल्याने त्याचा डीपी प्लान मंजुर होणे आवश्यक आहे. ६) कांद्री-टेकाडी वेकोलि कोळसा खदान अंतर्गत सुरू असलेला जेन एन हाॅस्पिटल मध्ये आधु निक आरोग्य सुधार व्यवस्था करून जनतेला आरोग्य सुविधा मिळावी. ७) कन्हान, कांद्री, टेकाडी पंतप्रधान घरकुल योजना प्रलंबित ‘ड’ यादी नागरिकांना पट्टे मिळण्यात यावे. ८) गोंडेगाव पुनवर्सन येथे अत्यावश्य क जनसुविधेचे कामे पुर्ण करण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्त जागा मालकाला त्याचा मोबदला त्वरीत देण्यात याला. ९) वराडा येथे सुरू असलेल्या कोल वाशरीचा वायु प्रदुषणामुळे नागरिकांना हानी होत असल्याने तो तेथुन हलविण्यात यावा.

अश्या जनहिता च्या विविध मांगण्याकरिता सोमवार (दि.२०) डिसेंबर ला सकाळी ११ वाजता तारसा रोड टी पाॅईंट चौक कन्हान येथे भाजपा द्वारे रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा. श्री डी मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतुत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. करिता या आंदोलनास परिसरातील नगरसेवक, सरपं च, सदस्य, शेतकरी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवा हन रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा. डी मल्लीकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
याप्रसंगी भाजप ओबीसी मोर्चाचे रामभाऊ दिवटे, जि प गोंडेगाव-साटक सदस्य व्यकटजी कारेमोरे, भाजपा तालुकाध्यक्ष अतुल हजारे, कन्हान शहराध्यक्ष डॉ मनोहर पाठक, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, माजी सरपंच जयराम मेहरकुळे, सुनिल लाडेकर, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, नगरसेविका संगिता ़खोब्रागडे, अनिता पाटील, सुषमा चोपकर सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सिहोरा कन्हान नदी पुलावरून उडी घेऊन युवकाने केली आत्महत्या

Sun Dec 19 , 2021
सिहोरा कन्हान नदी पुलावरून उडी घेऊन युवकाने केली आत्महत्या कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर शहर बाय पास राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील सिहोरा कन्हान नदी पुलावरून प्रफुल मंगर या युवकाने आजाराला कंटाळुन उडी घेऊन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. शनिवार (दि.१८) डिसेंबर ला […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta