सिलिंगच्या लोखंडी कडीला गळफास लावून आत्महत्या

सिलिंगच्या लोखंडी कडीला गळफास लावून आत्महत्या

कन्हान,ता.२८ फेब्रुवारी

     नागपूर- जबलपूर महामार्गावरील जुन्या पोस्ट कार्यालयाचा बाजूला ‌‌मृतक कोमल पाटील यांने राहत्या घरी सिलिंगचा लोखंडी कडीला दोराच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राकेश पाटील यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल केला.

     प्राप्त माहिती नुसार, मृतक कोमल चिंतामण पाटील (वय ४१) रा. कन्हान हा मानसिक तणावाखाली असल्याने त्याचा उपचार मनोचीकित्सक कडे सुरू होता.

     मृतक कोमल आपल्या राहत्या घरी, स्टेशनरी, लॅमिनेशन, झेरॉक्स दुकान सांभाळत होता. मानसिक तणावाचा बीमारी ने कंटाळुन कोमल याने शुक्रवार (दि.२४) फेब्रुवारी ला रात्री ११:३० ते शनिवार (दि.२५) फेब्रुवारी ला सकाळी ८:०० वाजता च्या दरम्यान राहत्या घरी सिलिंग च्या लोखंडी कडीला सुती दोरी ने गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरातील नागरिकांनी सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे, हरीष सोनभ्रदे, सम्राट वनपर्ती यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेले. मृतक कोमल याचे शवविच्छेदन करुन दुपार ला मृतदेह नातेवाईकांना सोपवुन कन्हान नदी शांती घाटवर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

     सदर प्रकरणा बाबत पोलीसांनी राकेश चिंतामण पाटील (वय ४७) राह.मु.प्लाट नंबर १८ ए.मुरलीधर सोसायटी गायत्री नगर झिंगाबाई टाकळी नागपुर यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग क्रमांक ७/२३ कलम १७४ जा.फौ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार सुर्यभान जळते हे करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान नदी पुलावर पुन्हा गड्डे पडुन सळाखी बाहेर आल्याने अपघाताची शक्यता शासन, प्रशासन, अधिकारी निद्रा अवस्थेत  पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दंडात्मक कारवाई होईल का ? 

Tue Feb 28 , 2023
  कन्हान नदी पुलावर पुन्हा गड्डे पडुन सळाखी बाहेर आल्याने अपघाताची शक्यता शासन, प्रशासन, अधिकारी निद्रा अवस्थेत पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दंडात्मक कारवाई होईल का ? कन्हान,ता.२८ फेब्रुवारी         कन्हान नदी वरील नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊन फक्त सहा महिन्याचा कालावधीत दोन ते तीन वेळा मोठ मोठे गड्डे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta