मंत्री सुनिल केदार यांची पुरग्रस्त भागात दौरा

मंत्री सुनिल केदार यांची पुरग्रस्त भागात दौरा

सावनेर : काही दिवसांपूर्वी कन्हान नदीला आलेल्या महापुरामुळे नदी काठावरील गावामधे महापुरामुळे हाहाकार माजला होता. नदी काठावरील नागरिकांचे, त्यांच्या साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याकरिता मंत्री सुनिल केदार पशुसंवर्धन विकास व पालकमंत्री यांचा सावनेर तालुक्यातील बिना संगम, भानेगाव, खापा, नंदापुर, रायवाडी इत्यादी गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना योग्य ते मदत तात्काळ मिळावी या करिता निर्देश दिले. त्याचप्रमाणे नदी काठावरील गावाचे पुनर्वसन करण्याकरिता तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. या पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यास कटिबद्ध हे शासन कटिबद्ध आहे.


यावेळी सावनेर चे उपविभागीय अधिकारी अतुल मत्र्हे , अनेक शासकिय विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन

Tue Sep 1 , 2020
पुरग्रस्त लोकांना तत्काळ मदत करण्या ची मागणी कन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन कन्हान : – पेच व तोतलाडोह धरण तुडुंब भरल्याने धरणाचे पुर्ण दरवाजे मोठ्या प्रमाणात उघड्यात आल्याने शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजता पासुन पिपरी गावात पाणी घुसल्याने नागरिकांचे भयंकर नुकसान झाले. या पुरग्रस्ताना झालेल्या नुकसानीचे नागरिकांना […]

You May Like

Archives

Categories

Meta