शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षा व्दारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षा व्दारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध

कन्हान, ता. ११ जानेवारी

    शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर काल सुनावणी पार पडली. सुनावणीत शिंदें ची शिवसेना असे जाहीर करण्यात आले आहे. निकाला नंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडुन संताप व्यक्त केला जात असुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चा निषेध करण्यात येत आहे.

     गुरूवार (दि.११) रोजी आंबेडकर चौक कन्हान येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यानी नारे व घोषणा बाजी करत निषेध जाहीर केला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालयाने ‘न्याय’ देण्यासाठी सांगितले होते. त्या नार्वेकरांनी नक्की काय निकाल दिला ? जे महाराष्ट्राला अपेक्षित होते की, हे मॅच फिक्सिंग करून निकाल देतील, तसाच तो निकाल होता. त्यामुळे आम्हाला धक्का बसला नाही, आश्चर्य ही वाटले नाही आणि लोकांनाही वाटले नाही. पण या निकालाने लोकांच्या मनात चीड निर्माण झाली आहे.

     सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला खोटं ठरवण्याचे काम राहुल नार्वेकर यांनी केले आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. आमची बाजु न्यायाची आणि सत्याची आहे. अशी खूप संकटं शिवसेनेने पाहिलेली आहेत. अशा संकटांना शिवसेना घाबरत नाही. या संकटातुन शिवसेना तापुन निघाली आहे. आताही निघेल, असे रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांनी म्हटले.

   यानिषेध मोर्चात शिवसेना जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले, पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे, लोक सभा सहसंपर्क प्रमुख उत्तम कापसे, उपजिल्हा प्रमुख प्रेम रोडेकर, विधानसभा सहसंपर्क प्रमुख सुत्तम मस्के, रामटेक विधानसभा सल्लागार प्रमुख अरुण बन्सोड, रामटेक तालुका प्रमुख हेमराज चोखान्द्रे, पारशिवनी तालुका प्रमुख कैलास खंडार, युवासेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर, कामगार सेना जिल्हाप्रमुख समीर मेश्राम, विधानसभा संघटक रमेश तांदुकळर, रामटेक विधानसभा संघटिका दुर्गा ताई कोचे, मौदा तालुका प्रमुख नरेश भोंदे, कन्हान शहर प्रमुख प्रभाकर बावणे, बादल कुंभलकर, राहुल टोंगसे, सुनील सहारे, मोहन कोरवते, इंद्रपाल बोरकर, पिंटू खंडार, राहुल वानखेडे, राहुल ढोबळे, लकडकर, सुरेश आंबिलडुके, श्याम मस्के, दयाशंकर नागपुरे, विजय सोयाम, वनिता मेश्राम, प्रमिला शेंडे सह रामटेक विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

स्व.बळीराम दखने यांना वाहिली श्रद्धांजली 

Thu Jan 11 , 2024
स्व.बळीराम दखने यांना वाहिली श्रद्धांजली कन्हान, ता.११ जानेवारी    बळीराम दखने हायस्कुल आणि विकास प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात संस्थापक अध्यक्ष स्व.बळीराम दखने यांचा पुण्यतिथी निमित्य श्रध्दाजंली अर्पण करून अभिवादन‌ कार्यक्रम पार पडला.    कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव, प्रमुख अतिथि विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत, […]

You May Like

Archives

Categories

Meta