कन्हान शहरातील १४५ रमाई घरकुल योजना लाभार्थ्याचा मार्ग मोकळा

कन्हान शहरातील १४५ रमाई घरकुल योजना लाभार्थ्याचा मार्ग मोकळा

कन्हान,ता.४ जूलै

    रमाई घरकुल योजने अंतर्गत मागिल साड़े तीन वर्षात अनुसूचित जातीच्या १४५ लाभार्थ्याच्या अर्जावर नगरपरिषद कन्हान च्या उदासीनतेमुळे कुठलिही कार्यवाही न झाल्याने लाभार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी भाजपा कन्हान‌ शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक च्या शिष्ठमंडळाने मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदनातून मागणी केली.

    सचिव संदीप जोशी नी त्वरित दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात १ जुलै ला बैठक घेतली. जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी मुख्याधिकारी यांना ७ दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्याकरिता कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने रमाई घरकुल योजना लाभार्थ्याचा मार्ग मोकळा‌ झाला.

     कन्हान नगरपरिषद ला रमाई घरकुल योजने अंतर्गत मागिल साड़े तीन वर्षात अनुसूचित जातीच्या शेकडो लाभार्थ्यानी अर्ज सादर केले होते. परंतु नगर परिषद कन्हानच्या उदासीनतेमुळे १४५ लाभार्थ्यांच्या अर्ज़ावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यामुळे सदर लाभार्थ्यांना न्याय मिळावा या करिता कन्हान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. मनोहर पाठक यांच्या शिष्ठमंडळाने (दि.१९) जून २०२३ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या कड़े निवेदन सादर केले होते.

    त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी त्वरित दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात १ जुलै २०२३ ला बैठक आयोजित केली. या बैठकिला स्वत: मा. संदीपजी जोशी, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनक र, उपविभागीय अधिकारी सौ वंदना सौरंगपते, नगर परिषदेचे मुख्याधिकारी बोरकर, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष, डॉ मनोहर पाठक, भाजपा ओबीसी आघाडी महामंत्री रामभाऊ दिवटे, भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनिल लाडेकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपूर ग्रा.जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे, न प कन्हान गट नेते राजेन्द्र शेंदरे, मनोज कुरडकर, नगरसेविका संगिता खोब्रागडे, नगरसेविका वंदना कुरडकर, अजय लोंढे , शैलेश शेळके, संजय रंगारी, विक्की सोलंकी, मयूर माटे, महेंद्र चव्हाण, सुरेश कळम्बे, अमोल साकोरे बैठकीला उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना ७ दिवसाच्या आत सर्व पात्र लाभार्थ्यांना रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल देण्याकरिता कार्यवाही करावी अशे निर्देश दिले. त्यामुळे यादीतील अनुसूचित जाती च्या १४५ लाभार्थ्यांना घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ग्रा.पं. येसंबात शाळेचा गणवेश व नवीन पाठ्य पुस्तकांच वाटप

Wed Jul 5 , 2023
ग्रा.पं.येसंबात शाळेचा गणवेश व नवीन पाठ्य पुस्तकांच वाटप कन्हान,ता.०४ जूलै     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येसंबा वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि.३०) जून रोजी शाळेचा गणवेश व नवीन शाळेतील पाठ्य पुस्तंकांच वाटप ग्रामपंचायत येसंबा च्या सरपंचा कु.सोनूताई इरपाते यांचा हस्ते वाटप करण्यात आले.      प्राथमिक शाळा येसंबा शिक्षण समितीचे […]

You May Like

Archives

Categories

Meta