डीसीपीएस अंतर्गत शिक्षकांच्या कपात निधीचा नाही मिळाला हिशोब

*डीसीपीएस अंतर्गत शिक्षकांच्या कपात निधीचा नाही मिळाला हिशोब..!*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन..*

कन्हान ता 16 : परिभाषीत अंशदायी नीवृत्तीवेतन योजना (डीसीपीएस) अंतर्गत शिक्षकांचे वेतनातून कपात झालेल्या निधीच्या हिशोबाच्या पावत्या संबंधित शिक्षकांना देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाकडून जिल्हा परिषदेच्या उप मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी श्रीमती शेंडे यांच्याकडे करण्यात आली.
शासनाने 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी परिभाषित निवृत्तीवेतन योजना (डीसीपीएस) लागू केली आणि 29/10/ 2010 च्या शासन निर्णयानावये शिक्षकांच्या वेतनातून 10% चालू व एक मागील असे दोन हफ्ते शिक्षकांच्या वेतनतातून कपात सुरू केली परंतू त्या रकमेचा हिशोब गेल्या आठ,दहा वर्षापासून जिल्ह्यातील डीसीपीएस धारक शिक्षकांना मिळाला नाही.शासन नियमानुसार जेवढी रक्कम दरमहा शिक्षकांच्या वेतनातून कपात झाली तेवढ्याच रकमेचा शासन हिस्सा जमा करणे क्रमप्राप्त होते.परंतू आजतागायत शासन हिस्सा जमा झाला किवा नाही त्यांच्या जमा रकमेवर व्याज किती मिळाले किवा कसे याचा हीशोब जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातही नाही.वेतनातून कपात झालेले शिक्षकांचे हजारो रूपये कुठे अडकून पडले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे त्यामुळे या रकमेच्या अचूक हिशोबाच्या पावत्या संबंधित शिक्षकांना देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली.
शिक्षण विभागामार्फत पंचायत समित्यांकडून शेड्युल मागवून डीसीपीएस अपडेट करून हिशोब शिक्षकांना देऊ असे आश्वासन यावेळी संघटनेच्या प्रतीनीधी मंडळाला उप मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी श्रीमती शेंडे यांनी दिले.निवेदन देतांना धनराज बोडे,वीरेंद्र वाघमारे,उज्वल रोकडे,अनिल दलाल,तुषार चरडे ,महेंद्र साव,उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नागपूर जिल्ह्य़ात कोरोना सर्वेक्षक शिक्षकाचा पहिला बळी

Thu Sep 17 , 2020
*नागपूर जिल्ह्य़ात कोरोना सर्वेक्षक शिक्षकाचा पहिला बळी* *कोरोना योध्दा अंतर्गत 50 लाखाची मदत द्या *विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची विभागीय आयुक्तांकडे मागणी * रामदास काकडे यांचे कोरोनाने निधन* कन्हान : ता 17 संप्टेबर कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात असणाऱ्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. यातूनच श्री रामदास काकडे (वय ५१) […]

You May Like

Archives

Categories

Meta