साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि शाहिर मेळावा उत्साहात संपन्न
शाहीर कलाकार यांच्या सुखात आणि दुःखात मी नेहमी साथ देणार – राजेंद्र मुळक
शाहीर कलाकार यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावे — शाहीर बावनकुळे

रामटेक,ता.09 ऑगस्ट
महाराष्ट्र शाहीर परिषद रामटेक व भारतीय कलाकार शाहीर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोककलावंत, कलाकारांचा शाहीर मेळावा संत रोहीदास सभागृह मंगळवारी वार्ड रामटेक येथे उत्साहात पार पडला.

भारतीय लोककला लोप पावु नये, ग्रामिण लोक कलेची जोपासणा करण्याकरिता ग्रामिण लोककला वंताना प्रोत्साहन मिळण्याच्या सार्थ हेतुने महाराष्ट्र शाहीर परिषद रामटेक व भारतीय कलाकार शाहीर मंडळ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोककलावंत, कलाकारांचा शाहीर मेळावा संत रोहीदास सभागृह मंगळवारी वार्ड रामटेक जि.नागपुर येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते.शाहीर मेळाव्याचे कवी ज्ञानेश्वर वांढरे विभागीय उपाध्यक्ष म.शा.प.पुणे, व अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ कामठी यांचे अध्यक्षेत व राजेंद्र मुळक माजी मंत्री, अध्यक्ष कॉग्रेस कमेटी नागपुर जिल्हा ग्रामिण यांचे हस्ते साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे व जय संताजी नाऱ्याचे जनक शाहीर भिमरावजी बावनकुळे गुरूजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व त्यांना अभिवादन करून शाहीर मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. राजेंद्र मुळक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शाहिर लोककला जपण्याकरिता पहिले लोककलावंताच्या मुलभुत गरजा व समस्या या शासना व्दारे सोडविण्यात आल्या तरच ग्रामिण कलावंत व लोककला जोपसली जाईल. शाहिरांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहे शाहिरी कला ही जुनी कला आहे. ती लोप पाऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, शाहिरांच्या सुखात आणि दुःखात मी नेहमी त्यांना मदत करेल अशी हमी दिली. महाराष्ट्र शाहीर परिषदेचे मा. जिल्हाध्यक्ष शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी सांगितले की, शाहिरांना संपूर्ण शासकीय योजनांचा लाभ मिळावे, सरकार ने सांस्कृतिक हॉल बांधून द्यावे, युवा शाहिरांनी आपला सांस्कृतिक वारसा जतन करावे ,मानधन वाढ करण्यात यावे, शाहीर कलावंताच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवुन देण्यास मी सदैव पर्यंत्नशिल असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रम चे अध्यक्ष कवी साहित्यिक ज्ञानेश्वर वांढरे म्हणाले की, सर्व शाहिर कलाकारांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या रेटून धरावे. शाहिर राजेंद्र बावनकुळे यांनी स्वतः मुंबई मंत्रालय येथे जाऊन माजी संस्कृती मंत्री विनोद तावडे, माजी ऊर्जामंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून 60 अर्ज पात्र होत होते. ते 100 अर्ज करून घेतले, तसेच मानधनात वाढ करून घेतले आणि पुढे म्हणाले शाहिरांच्या ज्या समस्या आहे त्यासाठी मी नेहमी मदतीसाठी तत्पर आहे असे वांढरे यांनी सांगितले, यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख रमेश कारामोरे, भागवत सहारे, शाहिर ब्रह्म नवघरे, सरपंच शिशुपाल अतकरे, शा.अरुण मेश्राम, शा.भगवान लांजेवार, नरहरी वासनिक, मोरेश्वर बडवाईक, चिरकूट पुनडेकर, लीलाधर वलांडरे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रम चे संचालन शा. युवराज अडकणे आणि आभार प्रदर्शन शा.अरुण मेश्राम यांनी मानले, मेळाव्याच्या यशस्विते करिता महाराष्ट्र शाहीर परिषद रामटेक तालुकाध्यक्ष, आयोजक शाहीर अरूण मेश्राम, शाहीर शंकर वडांद्रे, शा. प्रदीप कडबे, शा. वासुदेव आष्टणकर, शा. दिलीप मेश्राम, रविंद्र मेश्राम, रामराव वडांद्रे, रमेश रामटेके, चिरकुट पुनडेकर, सुरज नवघरे, गजानन वडे, वासुदेव नेवारे, राजेंद्र बावणे, दर्शन मेश्राम, रामनाथ देसाई, शोभेलाल ठाकरेले, पंचफुला मसकी, दुर्गा वासनिक, विमल वडे, अनिता बावणे, विश्वनाथ चौधरी, शंकर मौतकर, विष्णु मेंघरे, हिरालाल बघण, पत्रकार नथ्थुजी घरजाडे, मोतीराम रहाटे, कमल यादव, ऋषभ बावनकर, सुनील सरोदे, मनोहर बावनकर, वंदना घुमडे, जयराम सोनेकर, शंकर भडंग, पारशिवनी तालुकाध्यक्ष भगवान लांजेवार, नरेंद्र महल्ले सर संगीत विशारद, लोककलावंत शाहीर मंडळीनी परिश्रम घेतले.
Post Views: 831
Wed Aug 10 , 2022
माजी खा.प्रकाश जाधव यांच्या पुढाकाराने गोंडेगाव ग्रामस्थांला वेकोलिचे सहकार्य वेकोलि गोंडेगाव च्या दुर्लक्षते मुळे घरात पावसाचे पाणी शिरून घराचे नुकसान कन्हान,ता.10 ऑगस्ट गोंडेगावात पावसाचे पाणी कोळसा खुली खदान च्या डम्पींग मातीसह पाणी घरात शिरून उदारामजी शिंगणे यांच्या घरातील जिवनापयोजी वस्तुचे नुकसान व कृपाविलास गजभिये यांचे घर पडुन दोन्ही […]