निराधार महिलांना मा.राजेंद्र मुळक व्दारे शिलाई मशीन वाटप

 

निराधार महिलांना मा.राजेंद्र मुळक व्दारे शिलाई मशीन वाटप

कन्हान,ता.10 ऑगस्ट

      कोरोना काळात निराधार झालेल्या ग्रा.प.साटक व परिसरातील महिलांना स्वावलंबी करण्या करिता मा. राजेंद्रजी मुळक यांनी सामाजिक बांधिल की जपत भाऊ साहेब मुळक प्रतिष्ठाण च्या उपक्रमांतर्गत दहा लाभार्थी महिलांना शिवणयंत्र (शिलाई मशीन) वाटप करण्यात आल्या.

    ग्राम पंचायत साटक येथे माजी मंत्री तथा नागपुर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. राजेंद्र मुळक यांनी सामाजिक बांधिलकी जपत भाऊ साहेब मुळक प्रतिष्ठाण च्या उपक्रमांतर्गत साटक, निमखेडा, बोरडा (गणेशी), खेडी येथील कोरोनामुळे पती दिवंगत झालेल्या निराधार महिलांना स्वावलंबी करण्याकरिता स्वयंरोजगारच्या माध्यमातुन सक्षमिकरण करित परिवाराच्या पालन पोषणाकरिता मा.राजेंद्र मुळक साहेब, कॉग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष  दयारामजी भोयर, सुखराम लछोरे, बापुराव वांढरे, उपसभापती चेतन देशमुख, सरपंचा सिमाताई उकुंडे आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीमती इंदिरा नकुल वाडीभस्मे, वर्षा सुभाष लोंडे, चंद्रकला वासनिक, फुलवंती ज्ञानेश्वर मोहनकर, अनिता दिलीप लोंडे, गीतांजली फजित भुते, देवका ज्ञानेश्वर सुरसे, सविता महावीर बेणीबागडे, शुभांगी राजकुमार वाडीभस्मे, इंदिरा रमेश बंड या लाभार्थीना शिवणयंत्र (सिलाई मशिन) वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी डुमणजी चकोले, जिवलग चव्हाण, सुभाष तडस, यशवंताव उकुंडे, क्रीष्णाजी देशमुख, देवाभाऊ डोंगरे, रवींद्र गुडधे, रोशन तडस, गौरव भोयर, अमोल देशमुख, मंगेश भुते, विनोद पाटी ल, राजु चोपकर, मंगेश हिंगे सह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मंडळाच्या महिला आवर्जुन उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हरघर तिरंगा अभियान जोशात ; तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी रेशन दुकानातून केली जनजागृती

Sat Aug 13 , 2022
हरघर तिरंगा अभियान जोशात तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी रेशन दुकानातून केली जनजागृती सावनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद सरकार, राज्य सरकार यांचा सूचनेनुसार सावनेर तालुक्यात तहसीलदार प्रताप वाघमारे यांचे नेतृत्वात हरघर तिरंगा मोहीम जोमात राबविली जात आहे.या अनुषंगाने दिनांक 12 ऑगस्ट रोजी शहरातील विनायक केशवराव पाटील रेशन दुकानदार यांचे दुकानात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta