हरघर तिरंगा अभियान जोशात ; तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी रेशन दुकानातून केली जनजागृती

हरघर तिरंगा अभियान जोशात

तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी रेशन दुकानातून केली जनजागृती

सावनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद सरकार, राज्य सरकार यांचा सूचनेनुसार सावनेर तालुक्यात तहसीलदार प्रताप वाघमारे यांचे नेतृत्वात हरघर तिरंगा मोहीम जोमात राबविली जात आहे.या अनुषंगाने दिनांक 12 ऑगस्ट रोजी शहरातील विनायक केशवराव पाटील रेशन दुकानदार यांचे दुकानात तहसीलदार प्रताप वाघमारे, पुरवठा निरीक्षण अधिकारी वसुंधरा रघाटाटे, पुरवठा अधिकारी स्मिता नायगावकर यांचासह रेशन दुकानाला भेट देऊन उपस्थित ग्राहक व इतर दुकानदारांना हरघर तिरंगा अभियांचे महत्व विशिद करत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत 3 दिवस राष्टीय ध्वज फडकवावा अशे निवेदन उपस्थितांना केले.
सोबतच राष्टीय ध्वज उभारताना ध्वज उभारणीत आचार संहितेचे पालन करणे व राष्टीय ध्वजाची विटंबना होऊ नये यावर लक्ष द्यावे अशी विनंती केली.


हर घर तिरंगा या अनुषंगाने आलेले तहसीलदार वाघमारे व त्यांचे कर्मचारी आदींनी उपस्थित रेशन ग्राहकांना धान्याचे वाटप व प्रत्येकाला एक तिरंगा निशुल्क देण्यात आला.सोबतच उपस्थित सर्व गोर गरोब नागरिकांसोबत संवाद साधत शासनाचा योजनेची माहिती देत त्यांचा समस्या जणून घेतल्या


तसेच रेशन दुकानदार हे शासन व गोरगरीब नागरिकांचा मधतील महत्वाचा दुवा असल्याचे म्हणत रेशन दुकानदाराचा उत्साह द्विगुणित केला.
यावेळी रेशन दुकानदार विनायक पाटील, रामभाऊ दिवटे, विनोद अंतुरकर, नंदकिशोर पाटील, दिवाकर बले, जगदीश करोकर, अनिल बोन्द्रे इत्यादी दुकानदारा सह अन्नपुरवठा विभागाचे भारत नांदोरे, अमोल खोरने, सुमन कराळे, पवन पचभाई, निखिल कापसे प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पारशिवनी व्दारे बुट (जुते) वितरण

Sun Aug 14 , 2022
  महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पारशिवनी व्दारे बुट (जुते) वितरण कन्हान,ता.14 ऑगस्ट  महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना संपुर्ण महाराष्ट्रात अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्याच अनुसंगाने संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले व नागपुर जिल्हाध्यक्ष लालसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी व्दारे पंडित जवाहरलाल नेहरू कन्या विद्यालय […]

You May Like

Archives

Categories

Meta