उद्याला नितीन गडकरी यांच्या हस्ते पूलाचे लोकार्पण सोहळा  गडकरी कोणकोणत्या कामांची घोषणा करणार, कोणते प्रकल्प, सर्वाचे लक्ष  माजी आमदार मा.डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचा मार्गदर्शनात गडकरी साहेबांचे जंगी स्वागत 

उद्याला नितीन गडकरी यांच्या हस्ते पूलाचे लोकार्पण सोहळा

गडकरी कोणकोणत्या कामांची घोषणा करणार, कोणते प्रकल्प, सर्वाचे लक्ष

माजी आमदार मा.डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचा मार्गदर्शनात गडकरी साहेबांचे जंगी स्वागत

कन्हान,ता.1 सप्टेंबर

    केंन्द्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी उद्याला कन्हान नगरीत येत असून नागपुर- जबलपुर रोडवरील कन्हान येथे कन्हान नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम प्रकल्प एकुण 50.63 कोटी अधिक रूपयांच्या व पुलाची लांबी 415 मीटर विकास कामांचे त्यांच्या हस्ते गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 ला सांयकाळी 5.00 वाजता कन्हान ओव्हर ब्रिज कन्हान पुलाचे रस्ता आता खऱ्या अर्थाने वाहतुकीसाठी खुला होणार असून, सुसज्ज रस्त्यामुळे वेळ वाचणार आहे.

  गडकरी यांच्या दौर्‍याच्या निमित्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रस्ता उद्घाटनाची तर भाजपची स्वागताची तयारी सुरू झाली आहे. दौर्‍यात गडकरी आता कोणकोणत्या कामांची घोषणा करणार तसेच नवे कोणते प्रकल्प जाहीर करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागुन राहीले आहे. लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभा सदस्य रामटेक  कृपाल तुमाणे, विधान परिषद सदस्य अॅड. अभिजित वंजारी ,विधान परिषद सदस्य कामठी टेकचंद सावरकर,  विधान परिषद सदस्य नागो गाणार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे विधान परिषद सदस्य, श्रीमती रश्मीताई बर्वे अध्यक्षा,जिल्हा परिषद, नागपुर, विधान परिषद सदस्य प्रविण दटके, आशिष जैस्वाल विधान परिषद सदस्य रामटेक, सौ.करुणाताई आष्टणकर अध्यक्षा नगर परिषद कन्हान आदी सन्मानीय मान्यवर उपस्थित राहील. माजी आमदार मा.डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या मार्गदर्शनात राजेंद्र शेन्दे गटनेता कन्हान-पिपरी, व्यंकटेश कारेमोरे जिल्हा परिषद सदस्य, डाॅ.मनोहर पाठक अध्यक्ष भाजपा शहर, अतुल हजारे अध्यक्ष भाजपा तालुका पारशिवनी यांच्या नेतृत्वात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमाच्या आयोजना साठी झटत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बी.एस.एन.एल.टावरचा हजारो रूपयांचा मुद्देमाल लंपास

Sun Sep 4 , 2022
बी.एस.एन.एल.टावरचा हजारो रूपयांचा मुद्देमाल लंपास कन्हान,ता.03 सप्टेंबर        कन्हान येथील विकास शाळेचा पटागंणातील भारत संचार निगम लिमिटेडचे टावर असलेल्या अज्ञात युवकांनी एकुण छदोत्तीस हजार, दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरु केला आहे . पोलीसांकडून मिळाल्या माहिती नुसार भुषण […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta