दीपक महल्ले कुंटुबास शासना व्दारे चार लक्ष रूपयाची आर्थिक मदत 

 

 

दीपक महल्ले कुंटुबास शासना व्दारे चार लक्ष रूपयाची आर्थिक मदत

कन्हान,ता.06 ऑगस्ट

    मौदा तालुक्यातील ऐसंबा (सालवा) शेतातील बांधीत विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा घटना स्थळीच मुत्यु झाल्याने येथील सरपंच व परिसरातील ग्रामस्थांनी मुतकांच्या कुंटुबास तातडीने आर्थिक मदतीची मागणी जोर धरल्याने  शासना व्दारे मौदा तहसिलदार च्या मार्फत शेतकरी दिपक महल्ले च्या कुंटुंबला चार लाख रूपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली.
शनिवार (दि.३०) जुलै ला दुपारी मौदा तालुक्या तील ऐसंबा (सालवा) शेत शिवारात विज पडुन शेतकरी दिपक पाडुरंग महल्ले  ५४  राह. ऐसंबा (सालवा) यांचा अंगावर विज पडुन घटनास्थळीच त्यांचा मुत्यु झाल्याने त्यांच्या परिवारातील पत्नी, दोन मुली, दोन मुले यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळुन शेतक-या चा परिवार हवालदिल होत आर्थिक संकटात सापडल्याने शासनाने या कुंटुंबास तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी ऐसंबा  सरपंच व परिस रातील ग्रामस्थ शेतक-यांनी केली होती. शुक्रवार (दि. ५) ऑगस्ट ला ऐसंबा येथील शेतात विज पडुन मुत्यु पावलेले दिपक पांडुरंग महल्ले यांच्या घरी जावुन त्यांच्या कुंटुबाला शासना व्दारे आर्थीक मदत म्हणुन मौदा तहसिलदार मा. मलिक विराणी यांच्या हस्ते चार लक्ष रूपयांचा धनादेश देऊन मदत करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी काळे मँडम, तलाठी घाटे मँडम, ऐसंबा सरपंच धनराज हारोडे सह मुतकाचे कुंटुबिय प्रामुख्याने उपस्थित होते. शासना मार्फत मा. मलिक विराणी तहसिलदार यांनी तातडीने आर्थिक मदत मिळवुन दिल्याने ऐसंबा सरपंच धनराज हारोडे व कुंटुबियानी महाराष्ट्र शासन व तहसिलदारांचे आभार व्यकत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

निराधार महिलांना राजेंद्र मुळक व्दारे शिलाई मशीन वाटप. 

Sat Aug 6 , 2022
निराधार महिलांना राजेंद्र मुळक व्दारे शिलाई मशीन वाटप. नांदगाव च्या मुले व युवकाकरिता पावर जिम साहित्य वाटप. कन्हान,ता.06 ऑगस्ट कोरोना काळात निराधार झालेल्या ग्रा.प.नांदगाव येथील दोन महिलांना स्वावलंबी करण्याकरिता मा. राजेंद्रजी मुळक यांनी सामाजिक बांधिलकी जपत भाऊ साहेब मुळक प्रतिष्ठाण च्या उपक्रमांतर्गत शिवणयंत्र (शिलाई मशीन) भेट देत गावातील मुले, युवकांच्या […]

You May Like

Archives

Categories

Meta