महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची संयुक्त जयंती थाटात कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची संयुक्त जयंती थाटात

कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान,ता.02 ऑक्टोबर

    कन्हान शहर विकास मंच द्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले होते.

   कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे नवनियुक्त कोषाध्यक्ष प्रणय बावनकुळे यांच्या हस्ते व जेष्ठ नागरिक नंदकिशोर यादव, मोहनसिंग यादव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.  कार्यक्रमात उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे यांनी महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली.

  या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव सुरज वरखडे, सहसचिव प्रकाश कुर्वे, कोषाध्यक्ष प्रणय बावनकुळे, मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, हरीओम प्रकाश नारायण, अनुराग महल्ले, योगराज आकरे, शाहरुख खान, मंगेश खंगार, विनोद खडसे, सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दोन दिवस देवी मुर्ती व घट च्या विर्सजनाने नवरात्र महोत्सवाची सांगता

Sat Oct 8 , 2022
दोन दिवस देवी मुर्ती व घट च्या विर्सजनाने नवरात्र महोत्सवाची सांगता कन्हान,ता.08 ऑक्टोबर     शहरात आणी परिसरातील तीस गावात देवी मातेच्या मंदिरात व सार्वजनिक उत्सव मंडळाने कलश, कावड यात्रा, विधिवत पुजा अर्चना करून घट स्थापना व देवी मुर्तीची स्थापना करून नवरात्र महोत्सवाची थाटात सुरूवात करण्यात आली. मंदिरात व सार्वजनिक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta