रामकृष्ण मठ नागपुर व्दारे गरजु विद्यार्थ्याना गणवेश वाटप
आदर्श हायस्कुल येथे गणवेश वितरण
कन्हान, ता. 18
आर्दश हायस्कुल कन्हान येथे रामकृष्ण मठ धंतोली नागपुर यांच्या वतीने शाळेच्या गरिब, गरजु व होतकरू विद्यार्थांना गणवेश वितरण करण्यात आले. सोमवार (दि.१८) जुलै ला आदर्श हायस्कुल कन्हान येथे रामकृष्ण मठ धंतोली नागपुर यांच्या व्दारे शाळेतील गरजु विद्यार्थांना गणवेश वितरण कार्यक्रम आयोजन करून कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला मेश्राम यांच्या हस्ते व रामकृष्ण मठाचे पदाधिकारी विजय सिराज महाराज, सेवा निवृत्त व्यवस्थापक अरूण राऊत, प्रकल्प मँनेजर अजय भोयर, प्रशांत डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गरीब, गरजु व होतकरू विद्यार्थांना गणवेश वितरण करण्यात आले. यावेळी विजय सिराज महाराज यांनी स्वामी विवेकानंद तसेच त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या जीवना वर प्रकाश टाकुन त्यांचे चरित्र आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला मेश्राम यांनी विद्यार्थांना स्वामी विवेकानंद यांच्या सेवाभावी व त्यागाच्या महत्वा विषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आर्दश हायस्कुल चे शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका प्रिती बोपचे यांनी तर आभार छाया मिसार यांनी व्यक्त केले.
Post Views: 900