लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, गुरूपुजा, सांस्कृतिक व सत्कार सोहळा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, गुरूपुजा, सांस्कृतिक व सत्कार सोहळा

कन्हान,ता.8 ऑगस्ट

     दक्षिण मध्य क्षेत्र सांकृतिक केंद्र नागपुर व विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती प्रित्यर्थ गुरूपुजा, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलावंत, पत्रकारांचा सत्कार सोहळा मंगळवार (दि.९) ऑगस्ट रोजी हार्दीक मंगल कार्यालय कन्हान येथे आयोजित करण्यात आला आहे.
ग्रामिण लोक कलेची जोपासणा करण्याकरिता ग्रामिण लोक कलावंताना प्रोत्साहना करण्याच्या सार्थ हेतुने दक्षिण मध्य क्षेत्र सांकृतिक केंद्र नागपुर व विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान व्दारे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती प्रित्यर्थ गुरूपुजा, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलावंत, पत्रका रांचा सत्कार सोहळा आणि विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष स्व.धर्मराज भिवगडे यांच्या प्रथम पुण्यतिथी कार्यक्रम आज मंगळवार (दि.९) ऑगस्ट रोजी हार्दीक मंगल कार्यालय कन्हान येथे माजी मंत्री, आमदार सावनेर मा. सुनिल बाबु केदार यांच्या अध्यक्षेत व जि.प.नागपुर अध्यक्षा मा.सौ.रश्मीताई बर्वे उद्घाटक तर प्रमुथ अतिथी माजी मंत्री, अध्यक्ष कॉग्रेस क ना जि ग्रामिण मा.राजेंद्र मुळक, माजी आमदार मा.एस.क्यु.जामा, नरेश बर्वे, चंद्रपाल चौकसे, उल्लास मनोहर, शंकर चहांदे, राजकुमार घुले, बळवंत पडोळे, विलास काळे यांच्या प्रमुख उपस्थित सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत भजन मंडळाचे सादरीकरण, १२ ते १ वा. प्रमुख पाहुण्याचे स्वागत व कलावंताचा, पत्रकारांचा सत्कार सोहळा, दु. १ ते ३ वा. खडी गंमत, दंडार आणि दु. ३ ते ६ वाजेपर्यंत किर्तन मंडळाचे सादरीकरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल. या कार्य क्रमास बहु संख्येने शाहीर, लोककलावंत, कलाकारांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे अध्यक्ष श्री मनिष भिवगडे व कार्याध्यक्ष अंलकार टेंभुर्णे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

येसंबा येथे अमृत महोत्सव निमित्य भव्य रोगनिदान शिबीर संपन्न

Mon Aug 8 , 2022
येसंबा येथे अमृत महोत्सव निमित्य भव्य रोगनिदान शिबीर संपन्न                 १४० नागरिकांनी शिबीराचा घेतला लाभ. कन्हान,ता.08 ऑगस्ट         येसंबा (सालवा) येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य वेकोलि जवाहरलाल नेहरु हाॅस्पीटल कांद्री व येसंबा ग्राम पंचायत सरपंच धनराज हारोडे यांच्या संयुक्त […]

Breaking News

Archives

Categories

Meta