येसंबा येथे अमृत महोत्सव निमित्य भव्य रोगनिदान शिबीर संपन्न

येसंबा येथे अमृत महोत्सव निमित्य भव्य रोगनिदान शिबीर संपन्न

                १४० नागरिकांनी शिबीराचा घेतला लाभ.

कन्हान,ता.08 ऑगस्ट

        येसंबा (सालवा) येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य वेकोलि जवाहरलाल नेहरु हाॅस्पीटल कांद्री व येसंबा ग्राम पंचायत सरपंच धनराज हारोडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोगनिदान शिबीरात १४० ग्रामस्थांनी लाभ घेऊन अमृत महोत्सव निमित्य ” हर घर तिरंगा ” कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.


भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत असुन त्यास ‘आझादी का अमृत महोत्सव ‘ नाव देण्यात आलं आहे. अमृत महोत्सव हा भारत सरकार स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या लोकांचा, संस्कृतीचा आणि प्रगतीशिल भारताच्या गौरवशाली इतिहासाचा गौरव करण्यासाठी उपक्रम आहे. या निमित्य सोमवार (दि.८) ऑगस्ट ला वेकोलि जवाहरलाल नेहरू हॉस्पिटल कांद्री व येसंबा ग्राम पंचायत सरपंच धनराज हारोडे यांच्या संयुक्त विद्यमाने येसंबा गावात भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन शिबीरात मोफत तपासणी करून एकुण १४० ग्रामस्थ लाभार्थ्यांना औषधी वितरण करून लाभ देण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित डाॅक्टरांना, ग्राम पंचायत सदस्य, सदस्यांना, ग्रामस्थांना तिरंगा झेंडा वाटप करून ” हर घर तिरंगा ” कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्य आपल्या घरावर देशाचा तिरंगा झेंडा लावुन या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभाग घेत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात यावा असे आवाहन सरपंच धनराज हारोडे यांनी ग्रामस्थांना केले. शिबीर व हर घर तिरंगा कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वेकोलि मॅनेजर राजेश यादव, डॉ. बि.के. प्रसाद, डॉ.एम. तेजस्विनी, जगदिश चांडक , अरूण सेलोकर, शारदा शेंडे, सरपंच धनराज हारोडे, ग्रामसेवक कु.मेघा मेश्राम तसेच गावातील ग्रामस्थानी बहुसंख्येने उपस्थित राहुन सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शाहीर कलाकार यांच्या सुखात आणि दुःखात मी नेहमी साथ देणार - राजेंद्र मुळक 

Tue Aug 9 , 2022
  साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि शाहिर मेळावा उत्साहात संपन्न शाहीर कलाकार यांच्या सुखात आणि दुःखात मी नेहमी साथ देणार – राजेंद्र मुळक शाहीर कलाकार यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावे — शाहीर बावनकुळे रामटेक,ता.09 ऑगस्ट     महाराष्ट्र शाहीर परिषद रामटेक व भारतीय कलाकार शाहीर मंडळ यांच्या […]

You May Like

Archives

Categories

Meta