स्ट्रीट लाईटच्या खांबाला करंट, मुलगी थोडक्यात वाचली तर दोन डुक्कराचा करंट लागुन मृत्यु : जवादार कोण ?

स्ट्रीट लाईटच्या खांबाला करंट, मुलगी थोडक्यात वाचली तर दोन डुक्कराचा करंट लागुन मृत्यु

कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.५ धरमनगर कन्हान येथील स्ट्रीट लाईट खांबाला करंट येत असुन जवळच्या घरची एक लहान मुलगी थोडक्यात वाचली. तर दोन डुक्करांचा या खांबाचा विधृत शॉक लागुन मुत्यु झाल्याने नगरपरिषद प्रशासनाने या विधृत खांबा ची त्वरित दुरूस्ती करावी. अन्यथा होणा-या जिवित हानीस नगरपरिषद शासन, प्रशासन जिम्मेदार राहील. अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा (ग्रा) उपाध्यक्ष रिंकेश चवरे हयानी नगरपरिषद मुख्याधिकारी याना निवेदन देऊन केली आहे.


कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.५ धरमनगर कन्हान येथील स्ट्रीट लाईट खांबाला करंट येत असुन बुधवार (दि.१८) मे ला जवळच्या घराची एक लहान मुलगी थोडक्यात वाचली. तर दोन डुक्करां चा या विधृत दिवे खांबाचा विधृत शॉक लागुन मुत्यु झाला. धरमनगर येथील स्ट्रीट लाइट लावल्या पासुन काही स्ट्रीट लाईट बंद आहेत तर काही सुरू आहेत. शुरू असलेल्या पैकी काही स्ट्रीट लाईट खांबाला करंट आहे. यामुळे सामोर पावसाळयाचे दिवस असल्याने सर्व स्ट्रीट लाईट खांबाची वायरिंग तपासुन येणारा करंट दुरूस्ती करावा. या समस्येकडे येथील नगरसेव क, नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करित आहे. नगराध्य क्षा चे घर अवघ्या १५० मीटर असुन ५ ते ६ दिवस लोटुन संबधितानी येऊन सुध्दा पाहीले नाही. यास्तव येथील नागरिकांच्या वतीने भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा (ग्रा) उपाध्यक्ष रिंकेश चवरे यानी मुख्याधिकारी नगरपरिषद कन्हान हयाना विधृत खांबा ची त्वरित दुरूस्ती करावी. अन्यथा होणा-या जिवित हानीस नगरपरिषद शासन, प्रशासन जिम्मेदार राहील. असे निवेदन देऊन ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली असुन प्रतिलिपी कन्हान पोलीस स्टेशन ला देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान नवीन पुलाचे राज्यमंत्री सुनिल केदार यांनी केली पाहणी

Tue May 24 , 2022
कन्हान नवीन पुलाचे राज्यमंत्री सुनिल केदार यांनी केली पाहणी #) पुलाचे काम त्वरित करा. जि प अध्यक्षा बर्वे चे राष्ट्रीय महामार्ग विभागीय अभियंताना निवेदन. #) आज जि प नागपुर येथे संबधित अधिका-यां ची बैठक.  कन्हान : – राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ येथील कन्हान नदी वर नवीन पुलाचे काम २०१४ ला सुरू झाले. […]

You May Like

Archives

Categories

Meta