व्यसनाचा आहारी जाऊ नका, आरोग्य सांभाळा चिमुकल्यांनी दिला संदेश  कन्हान शहरात विविध ठिकाणी ताना पोळा साजरा 

व्यसनाचा आहारी जाऊ नका, आरोग्य सांभाळा चिमुकल्यांनी दिला संदेश

कन्हान शहरात विविध ठिकाणी ताना पोळा साजरा

कन्हान,ता.१९

  सकाळ पासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे लहान मुलांचे चेहरे हिरमुसली दिसली. पण मात्र सायंकाळी पाऊस थांबल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.यातच आयोजकांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील निर्णय जनरल स्टोअर्स, शिव नगर, तारसा रोड कन्हान येथे ताना पोळयाचे आयोजन केले.

    मुलांनी तोरणात उपस्थिती दर्शवून पर्यावरण रक्षणाची “शिक्षा हीच असेल आपल्या जीवनाची रक्षा” संदेश दिला.

 

   यावेळी ताना पोळ्याच्या कार्यक्रमात विशेष पाहुणे रामभाऊ दिवटे, ज्ञानेश्वर हुड, डॉ. श्रीकृष्ण जामोदकर विशेष अतिथी कन्हान ठाणेदार सार्थक नेहते , शालिकराम महाजन, नरेश श्रावणकर, सुनील सरोदे प्रमुख उपस्थिती सूर्यभान कुंभलकर, डॉ. श्याम दापोलकर, ज्ञानेश्वर हुड, उमाकां नाटकर, ज्ञानेश्वर कोचे, स्वप्निल चकोले, रघुनाथ मंगर, रुपराव भोंगाडे, दीपक कुंभलकर, कल्याण ईखार, रंगराव ठाकरे, प्रणय कुंभलकर सौ.सुनंदाताई दिवटे, सौ प्रतिभाताई कुंभलकर, प्रियाताई कोचे, मोनाताई कोचे , जयाताई कुंभलकर, पूजाताई कुंभलकर, कार्यक्रम आयोजक निर्णय कुंभलकर, व आभार प्रदर्शन ऋषि कोचे यांनी केले.

रायनगर, कन्हान येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

     रायनगर येथे तान्हा पोळयाचे आयोजन करण्यात आले. लहान लहान मूले वेगवेगळ्या वेशभुशे मध्ये आले होते. विधिवत पूजा अर्चना करुण कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

रिंकेश चवरे मित्र परिवार तर्फे लहान मुलांना टिफ़िन बॉक्स आणि पेन वाटप करण्यात आले. कार्यक्रमात कन्हान नगर परिषद उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक, भाजपा तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्मे, गुरुदेव चकोले भाजपा कांद्री अध्यक्ष, राजूभाऊ पाटिल, नीलकंठ मस्के, रिंकेश चवरे, धीरज नाईक, शैलेश शेळके, मुस्तफा कुरेशी, विलोम गुप्ता, सृजल गनवीर, बादल ऊके, प्रियांशु उरकुड़े, अमन राउत, प्रतीक्षा चवरे, सुषमा मस्के, कविता मेश्राम, सुभाष सायरे ऋषिकेश चवरे, पीयूष भेलावे, शुभम सिडाम, आयुष पाटिल, राज यादव, सागर यादव, मनीष सिडाम, मनक गायकवाड़, आयुष पाटिल, अभिषेक मेहता पिंकी चवरे, सागर ऊके, राजेन्द्र बुंदेलिया, आशु गुप्ता, अर्जुन मड़ावी, रोहन चव्हाण उपस्थित होते.

रायनगर हनुमान मंदिर येथे ताना पोळा

   लहान मुलांना ताना पोळ्याच्या माध्यमातून शेती विषयी प्रेम आणि राब राब रानात राबणाऱ्या बैलांची लाकडी बैलाचा माध्यमातून जिव्हाळा निर्माण होऊन आदर्श रूजण्याकरीता हनुमान मंदिर येथे ताना पोळा साजरा करण्यात आला.

   याावेळी भाजपा जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे, तालुका संपर्क प्रमुख शैलेश शेळके, निलकंठ मस्के, प्रतीक्षा चवरे, सुषमा मस्के यांचा कडून गिफ्ट उपस्थित प्रमुख पाहुणे भाजपा तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्में, कन्हान शहर अध्यक्ष मनोहर पाठक, कांन्द्री शहर अध्यक्ष गुरुदेव चकोले, नगर सेवक पुष्पा काकुड़कर ,राजुभाऊ पाटिल यांचा हस्ते वाटण्यात आले.या कार्यक्रमात संयोजक म्हणून मंदिर कमेटीचे कार्यभार पवन माने, राजेश हुड, अजय सरोदे, गजानन कुंभलकर, प्रशांत चरडे, रामप्रशाद शर्मा, प्रविन माने, जगदीश हूड, विनायक हिवसे, किशोर येरपुढे, सुनील अंबागडे, पिंटू निम्बूलकर, योगेश बोरकुटे, शरद कावडकर यांनी संभाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पोलीस अधीक्षकांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा गणेश विसर्जनाच्या स्थळी घाटाची पाहणी‌ व‌ पोलीसांना सुचना 

Thu Sep 21 , 2023
पोलीस अधीक्षकांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा गणेश विसर्जनाच्या स्थळी घाटाची पाहणी‌ व‌ पोलीसांना सुचना कन्हान, ता. २१    पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथील गणपती स्थापना बंदोबस्ताचा आढावा घेत कन्हान नदी काठावरील काली माता घाटावर विसर्जन स्थळाची पाहणी केली.     मंगळवार (दि.१९) सप्टेंबर २०२३ पासुन मोठया […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta