हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

कन्हान,ता.२३ जानेवारी

   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय जे एन रोड कन्हान येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त १०१ किलो बुंदी व फळ वितरण करून जयंती साजरी करण्यात आली.

     मंगळवार (दि.२३) जानेवारी २०२४ ला शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय जे.एन.रोड ब्रुकबांड कंपनी समोर कन्हान येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा प्रतिमेला नगरसेवक गट नेता मनिष भिवगडे, जेष्ट शिवसैनिक दिलीप राईकवार, महेंद्र भुरे, गणेश भोंगाडे आदीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    याप्रसंगी बंटी हेटे यांनी मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना व शिवसैनिका सह मराठी माणुस आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती उपस्थिताना दिली. कार्यक्रमाचे आयोजक सचिन साळवी, बेटी हेट, रुपेश सातपुते यांच्या व्दारे महामार्गाने ये-जा करणा-या नागरिकांना १०१ किलोचा बुंदा व उपस्थिता ना फळ आणि अल्पोहार वितरण करून मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता पुरुषोत्तम येणेकर, शिव स्वामी, प्रकाश निमोडे, हफीज शेख, शितल भिमणवार, आशिष वाडकर, राजन भिसेे, जितेन्द्र तिवारी, अनिल बारई आदिनी सहकार्य केले.

    हिंदु हृदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कन्हान शहरातील शिवसेना (उ.बा.ठा.) कार्यालय तारसा रोड येथे श्री. विशाल बरबटे रामटेक विधानसभा प्रमुख यांचे मार्गदर्शनात उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्ग दर्शन केले. याप्रसंगी कन्हान शहर प्रमुख श्री प्रभाकर बावणे, जेष्ट शिवसैनिक अंबादास खंडारे, सुत्तम मस्के , नेवालाल पात्रे, लंगडा शेंडे, भुरा पात्रे, ईश्वर शेंडे, महेंद्र खडसे, सावन लोंढे, सन्नी पात्रे, बादल लोंढे, सावण लोकडे, सतिश नाडे, सागर पात्रे, संजय पात्रे सह पदाधिकारी व शिवसैनिक बहु संख्येने उपस्थित राहुन मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रेल्वे स्टेशन कन्हान येथे पोलिसांची मॉक ड्रिल भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास, पोलिसाची रंगित तालिम 

Wed Jan 24 , 2024
रेल्वे स्टेशन कन्हान येथे पोलिसांची मॉक ड्रिल भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास, पोलिसाची रंगित तालिम  कन्हान, ता. २४ जानेवारी     नागपुर ग्रामिण जिल्हयातील पोलीस स्टेशन कन्हान येथे भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास सदर वेळची परिस्थीती योग्य प्रकारे हाताळण्यात यावी.    या करिता रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर रूम मध्ये अनधिकृत प्रवेश करून स्टेशन […]

You May Like

Archives

Categories

Meta