ट्रक च्या धडकेत दुचाकी चालकाचा मुत्यु तर एक गंभीर जख्मी

 ट्रक च्या धडकेत दुचाकी चालकाचा मुत्यु तर एक गंभीर जख्मी

कन्हान : – दोघे पेंटर, पेंटीग चे काम आटोपून मनसर वरून नागपूर कडे दुचाकीने येत असताना बंद टोल नाका वराडा शिवारात चारपदरी महामार्गावर बारा चाकी ट्रकने वळण घेऊन दुचाकीला धडक दिल्याने अपघातात दुचाकी चालक पवन ढोरे याला नेतांना मुत्यु झाला तर मागे स्वार भुषण बावणे जख्मी झाल्याने मेडीकल नागपुर येथे उपचार सुरू आहे. कन्हान पोलीसानी जख्मी भिषण बावने यांच्या तक्रारीवरून  ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवार (दि.१५) जुलै ला सकाळी ६.३० वा. दरम्यान भुषण पुरूषोत्तम बावणे ३३ राह. आयचित मंदीर कुनबी पुरा महल रोड नागपुर व मित्र पवन लक्ष्मणराव ढोरे २९ राह. नाईक तलाव नागपुर हे दोघेही पेंटर असुन शहापुर (अंगणवाडी) पवनी ता. रामटेक ला पेंटीगचे काम करून मनसर वरून नागपुर कडे दुचाकी युनिकॉन मो.सा. क्र. एम एच – ३१ एफ के १८९९ ने डबलसिट येत असताना बंद टोल नाका वराडा शिवारातील राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वर बारा चाकी ट्रक क्र. ए पी – १६ – टी एफ – ९५४९ च्या बारा चाकी ट्रक चालकाने आपले वाहण यु टर्न घेत असताना भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवुन दुचाकी ला डाव्या बाजुला धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकीसह रोडवर खाली पडल्याने लोकानी रूग्णवाहीकेने उपचारासाठी पवन ला मेओ हॉस्पीटल नागपुर येथे भर्ती केले व भुषण ला डोक्या वर मार लागल्याने मेडीकल कॉलेज नागपुर ट्रामा वार्ड मध्ये भर्ती करून उपचार सुरू आहे. भुषण चा लहान भाउ राजु बावणे यानी सांगितले की, पवन ढोरे याचा उपचारा दरम्यान मेओ हॉस्पीटल येथे उपचारा दरम्यान मुत्यु झाला. कन्हान पोस्टे चे पोहवा जयलाल सहारे व विरेंद्र चौधरी यांनी मेडीकल नागपुर येथे पोहचुन गंभीर जख्मी भुषण बावने यांच्या तोंडी बयाणा वरून ट्रक चालका डी.नानी राह. आंध्रप्रदेश यांचे विरूध्द कलम २७९, ३३८, ३०४ अ, सह कलम १८४ मोवाका नुसार गुन्हा दाखल करून अटक केली व न्यायालयात हजर केले असता त्याला जामीनावर सोडण्यात आले. ही कार्यवाही कन्हान थानेदार पोनि विलास काळे यांचे मार्गदर्शनात पोहवा जयलाल सहारे व विरेंद्र चौधरी हे पुढील तपास करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

टेकाडी येथे अवैध कोळसा टाल वर धाड

Sat Jul 16 , 2022
टेकाडी येथे अवैध कोळसा टाल वर धाड वेकोलि सुरक्षा अधिकारी यांची सयुक्त कारवाहीत ४६८० रूपयाचा कोळसा जप्त. कन्हान : – महाजन नगर टेकाडी येथे चार आरोपीतांनी संगमत करून अवैध कोळसा टाल सुरू करून वेको लि चा कोळसा चोरी करून ढीग जमा करित असल्या ची वेकोलि सुरक्षा अधिकारी यांना गुप्त माहिती […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta