माजी मुख्याध्यापक बलवंतराव थटेरे यांचे निधन  शासकिय एम्स येथे मरणोपरांत नेत्रदान व देहदान 

माजी मुख्याध्यापक बलवंतराव थटेरे यांचे निधन

शासकिय एम्स येथे मरणोपरांत नेत्रदान व देहदान

कन्हान,ता.२८ जुलै

    विकास हायस्कुल ( बळीराम दखने ) कन्हान शहरातील कर्तव्यदक्ष माजी मुख्याध्यापक बलवंतरावजी थटेरे सर यांचे शुक्रवार (दि.२८) जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले.

    विकास हायस्कुल कन्हान च्या इ.स.१९६३ ला स्थापने पासुन मुख्याध्यापक पदावर निरंतर शिक्षणाचे सेवाकार्य करून १९९४ मध्ये सेवानिवृत्त झाले. ३१ वर्ष कर्तव्य दक्षपणे कार्यरत राहुन शाळेला मानसन्मान प्राप्त करून देण्यास महत्वाची भुमिका बजावली. त्यांनीे भारतीय राष्ट्रीय कांग्रेस सेवादल मध्ये ३५ वर्ष मुख्य प्रशिक्षक म्हणुन कार्य केेले.

   महाराष्ट्र शासनाचा श्रेष्ठ शिक्षक पुरुस्कार प्राप्त झाला होता. त्यांनी आठ पुस्तकांचे प्रकाशन केले. त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत देहदान व नेत्रदान करण्याचा निर्धार असल्याने त्यांचे शरीर शनिवार (दि.२९) ला सकाळी ९.३० वाजता त्यांची अंतिम यात्रा त्यांचे पुत्र अजय बलवंत थटेरे यांचे निवास स्थान प्वॉट नं. ६ कपिल टॉवर कँनल रोड, रामदास पेठ, नागपुर येथुन काढुन शासकिय एम्स दवाखाना मिहान नागपुर येथे १० वाजता दान करण्यात येईल. त्यांच्या प्रश्चात तीन मुले, दोन मुली सर्व विवाहीत नातु , नातिन व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नवनिर्मित पुलाच्या गड्ड्यात कमळाच्या फुलाने वाहिली श्रद्धाजंली युवक काँग्रेस पदाधिका-यांनी अनोख्या उपक्रमाने वेधले प्रशासनाचे लक्ष 

Fri Jul 28 , 2023
नवनिर्मित पुलाच्या गड्ड्यात कमळाच्या फुलाने वाहिली श्रद्धाजंली युवक काँग्रेस पदाधिका-यांनी अनोख्या उपक्रमाने वेधले प्रशासनाचे लक्ष कन्हान,ता.२८ जुलै    नदी वरील नवनिर्मित पुलाचे उद्घाटन फक्त अकरा महिने झाले असुन खुप वेळा मोठ – मोठे गड्डे पडुन सळाखी दिसु लागल्याने युवक काँग्रेस च्या पदाधिका-यांनी गड्ड्यात फुले व कमळाचे फुले लावुन विकास कामांच्या […]

You May Like

Archives

Categories

Meta