वराडा शेतशिवारात बिबटया च्या हल्ल्यात १ कारवड ठार

वराडा शेतशिवारात बिबटया च्या हल्ल्यात १ कारवड ठार.

#) सहा गावच्या शेत शिवारात बिबटयाच्या १० वेळा हल्यात १२ प्राळीव प्राणी ठार तर ५ जख्मी.

कन्हान : – पारशिवनी तालुकातील मौजा वराडा गाव च्या शेत शिवारात बिबटयाने तिस-यादा हल्ला करून एक जर्शी कारवड ठार केली असुन आता पर्यंत ३ प्राळीव जनावरे कारवड ठार केले. तर एक वासरू जख्मी केले आता पर्यंत परिसरातील १० घटनेत जर्शी कारवड- ६, गोरा- २, बकरी – ३, कुत्रा- १ असे १२ प्राळीव जनावराना ठार केले तर ५ जनावरांना जख्मी केल्याने पेंच व कन्हान नदी काठावरील घाटरोहणा, जुनिकामठी, गाडेघाट, पिपरी, टेकाडी, वराडा, एसंबा, वाघोली नांदगाव, बखारी, गोंडेगाव कोळसा खदान व जवळपास च्या परिसरात पुनःश्च भयंकर भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाने युध्दस्तरावर बिबटयास पकडुन परिसरातील ग्रामस्था ना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
पेच व्याघ्र प्रकल्पाच्या रामटेक वन परिक्षेत्र अंतर्गत पटगोवारी रेंज मधिल वराडा येथील शेतकरी श्री सुधाकर खिळेकर यांचे मालकी शेत गोठयात गुरूवार (दि.३) फेब्रुवारी ला रात्री ६ ते ८ पाळीव जनावरे आपल्या शेत गोठयात बाधुन आपल्या घरी आले.नेहमी प्रमाणे शुक्रवार (दि.४) ला सकाळी शेतात गेले असता जर्शी कारवड ला बिबटषाने ठार केल्याचे दिस ल्याने ग्रामस्थाच्या मदतीने वनविभाग पटगोवारी वनरक्षक श्री एस जी टेकाम ला भ्रमणध्वनीने माहीती दिली. तात्काळ वनरक्षक एस जे टेकाम यांनी घटनेची माहीती आपले प्भारी वरिष्ठ अधिकारी वन क्षेत्र सहायक भोंगाडे साहेबाना देऊन वरिष्ठाचे आदेशाने वन कर्मी ला सोबत घेऊन पोहचुन घटना स्थळाचे निरिक्षण करून पंच १) रविशंकर ब्रम्हाणकर २) विक्रम शेळकी दोन्ही राह. वराडा या पंचाचे साहयाने पंचनामा करून अहवाल वनविभागाचे श्रेत्र सहायक अधिकारी भोंगाडे याना दिला. गावकरी नागीरक व पिडित शेतकरी पशु मालक सुधाकर खिळेकर यांची दोन वर्षाच्या जर्शी कारवड ला ठार केल्याने पशु मालक सुधाकर खिळेकर यांचे २१ हजार रूपयांचे नुकसान झाल्याने गावातील नागरिक व पिडीत शेतकरी यांनी वनरक्षक श्रीकांत टेकाम याचेशी चर्चा करून मृत कारवड चे नुकसान भरपाई म्हणुन शासना कडुन २१ हजार रूपये आर्थिक सहाय्यता त्वरित मिळवुन दयावी अशी मागणी केली.

पशुपालकाना आर्थिक साहय करून बिबटयाचा बंदोबस्त करावा.- माजी खासदार प्रकाश जाधव

मागील दोन महिन्या बखारी- दोन घटनेत १गोरा ठार १ कारवड जख्मी, गाडेघाट- १ कारवड, १ कुत्रा ठार, पिपरी- १ कारवड, एंसबा- १ कारवड, १ बकरी, घाटरोहणा – १ गोरा, २ बकरी ठार तर १ बकरी जख्मी, वराडा शेत शिवारात बिबटयाने तिनदा केलल्या हल्यात ३ जर्शी कारवड ठार, १ वासरू जख्मी असे आता पर्यत परिसरातील बिबटयाच्या १० हल्यात ६ गाव चे २ गोरे, ६ जर्शी कारवड, ३ बकरी, १ कुत्रा असे १२ प्राळीव प्राणी ठार तर ५ जख्मी केल्याने पशुपालक शेतक-यांचे भंयकर नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई म्हणुन आर्थिक सहाय्य करण्यात यावे. तसेच या बिबटया पासुन ग्रामस्थाच्या जिवितास सुध्दा धोका निर्माण निर्माण झाल्याने या बिबटयास वनविभागाने पकडुन घनदाट वनात नेऊन सोडुन परिसरातील ग्रामस्थाना दिलासा दयावा. असे माजी खासदार प्रकाश जाधव मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ०५, साटक १२ कन्हान परिसर एकुण १७ कोरोना संक्रमित

Sun Feb 6 , 2022
कन्हान ०५, साटक १२ कन्हान परिसर एकुण १७ कोरोना संक्रमित #) तिस-या लाटेची चाहुल ४८ कोरोना होम कोरंटाईन, करून कन्हान परिसर एकुण ३९०. कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या ३० तपासणी कन्हान ०५, प्राथ मिक आरोग्य केंद्र […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta