गावा बाहेरून ११ केव्ही विद्युत लाईन करा , वेकोलि कंत्राटदाराकडे स्थानिय युवकाना रोजगार द्या.
# ) मंत्री सुनिल केदार यांना युवक कॉग्रेस पारशिवनी तालुका व्दारे निवेदन.

कन्हान : – न्यु गोंडेगावातील ११ के व्ही विद्युत पुरवठा करणारी लाईन गावा बाहेरून करा. तसेच वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा च्या खाजगी कंम्पनी कंत्राटदारा कडे स्थानिय युवकांना रोजगार देण्याची मागणी मा. मंत्री सुनिल केदार साहेबांना साहिल गजभिये महासचिव युवक कॉग्रेस पारशिवनी तालुका यांच्या नेतुत्वात निवेदन देऊन करण्यात आली.
पुनर्वसित न्यु गोंडेगावाच्या आत मधुन काही प्लाट मधुन ११ के व्ही विधृत पुरवठा करणारी लाईन असल्याने पुढे धोका होऊन जिवहानी होऊ नये म्हणुन गावाच्या बाहेरून ही विद्युत लाईन करण्यात यावी. तसेच वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान च्या खाजगी कंपनी कंत्राटदारा कडे बाहेरील लोंकाना रोजगार देऊन स्थानिय युवकाना डावलण्यात येत असल्याने गोंडेगाव व जवळपास गावातील युवा बेरोजगाराना रोजगार देण्याची मागणी मा सुनिल केदार साहेब कॅबिनेट मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण हयांना साहिल गजभिये महासचिव युवक कॉग्रेस पारशिवनी तालुका यांच्या नेतुत्वात निवेदन देऊन करण्यात आली.
याप्रसंगी देविदास जामदार माजी सभापती कृ उ बा स पारशिवनी, सिताराम (पटेल) भारद्वाज संचालक कृ उ बा स पारशिवनी, रामभाऊजी ठाकरे, प्रविण जगताप आदी प्रामुख्याने उपस्थित होते.