आमडी हिवरी शिवारात श्रमदानातुन वनराई बंधारा निर्माण

आमडी हिवरी शिवारात श्रमदानातुन वनराई बंधारा निर्माण

कन्हान : – मौजा हिवरी (हिवरा) ग्राम पंचायत आमडी शिवारातील नाल्यावर महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी डॉ.ए.टी. गच्चे यांच्या मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी कन्हान जी.बी. वाघ यांच्या पुढाकाराने हिवरी (हिवरा) येथील शेतकरी व नागरिकांच्या सहकार्याने श्रमदानातुन गाव शिवारातील जिवंत नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला.

       या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यानंतर नाल्यातुन वाहुन जाणारे पाणी पारंपारिक पद्धतीने अडवून ते पाणी जमिनीत जिरविण्यासाठी मदत होईल. वनराई बंधा-यात साठलेल्या पाण्यामुळे आसपासच्या शिवारातील भुजल पातळी वाढून तलाव, विहिरीत जल पातळी वाढण्यास मदत होईल, आणि सदर नाल्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी सिंचनाची व्यवस्था होईल.  या सार्थ हेतुने बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली.

यावेळी ग्रा प आमडी (हिवरी) च्या सरपंचा सौ.शुभांगी ताई भोस्कर, शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख श्री. राजु भाऊ भोस्कर, मंडळ कृषी अधिकारी जी.बी. वाघ , माजी सरपंच श्री. जिवलग चव्हाण, कृषी पर्यवेक्षक कु. संपकाळ मॅडम, कृषी सहाय्यक कु. राठोड, कु. ढंगारे, श्री. ठोंबरे, कृषी मित्र श्री झाडे भाऊ, रोजगार सेवक सत्यशील चव्हाण व गावकरी रत्नमाला ढोके , रुक्माबाई दहाडे, मंदाबाई चव्हाण, शिल्पाबाई चव्हाण, शालु केळकर, रत्नमाला चव्हाण, यशोदाबाई घोडमारे, रोशन नवधिंगे, प्रतिक बारई, अभिषेक वाघमारे, रजत वासे आदीसह गावातील शेतक-याच्या सहकार्याने श्रमदान करून वनराई बंधारा बांधण्यात आला.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पाच आरोपी सह ३,४०,१००चे मुद्देमाल जप्त , स्थानिय गुन्हे शाखेला यश

Mon Dec 21 , 2020
पारशिवनी येथील जबरी चोरी टोळी चे पाच आरोपी सह ३,४०,१००चे मुद्देमाल स्थानिय गुन्हे शाखेचे पथकाने केले जेरबंद कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रतिनिधी पारशिवनी (ता प्र):-पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीत ईटगाव कडे जाणारे तक्रारर्कता फिर्यादी प्रदीप अभिमन्यू साखरे वय २८ राहणार वार्ड क्रमांक २ चणकापूर खापरखेडा तालुका सावनेर जिल्हा नागपूर हे दिनांक […]

You May Like

Archives

Categories

Meta