पिकांची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके याबाबत मार्गदर्शन

*साटक,बनपुरी ,हुमरी येथे घरच्या घरी सोयाबीन, तूर या पिकांची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके याबाबत मार्गदर्शन करण्यात आले*.


*पारशिवनी* (ता प्र):- कृर्षि विभाग पारशिवनी ०दारे कन्हान कृर्षी मंडळ अर्नगतं आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाकडून संपूर्ण पारशिवानी तालुक्यात विविध उपक्रम मोहीम स्वरूपात राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत तालुक्यातील साटक, बनपुरी,डुमरी कला, चिचभुवन तसेच कन्हान मंडळ अंतर्गत येणाऱ्या बहुतांश गावांमध्ये शेतकऱ्यांना धान पिकातील 3 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया व जैविक तसेच रासायनिक औषधांची बीजप्रक्रिया, घरच्या घरी सोयाबीन, तूर या पिकांची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांच्या संकल्पनेतुन घरचे सोयाबीनचे बियाणे वापरण्यासाठी त्याची उगवण क्षमता चाचणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे शिवाय कन्हान मंडळात मोठ्या प्रमाणात धानाचे क्षेत्र असल्याने घरच्याघरी बियाण्यावर अत्यंत सोप्या पद्धतीने 3 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करून धान पिकात येणाऱ्या करपा,कडा करपा ,कानी तसेच इतर बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण व भविष्यात होणारा फवारणीचा खर्च कमी करून उत्पादन कसे वाढवता येईल या बाबतीत मोहीम स्वरूपात काम कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. याच प्रमाणे डुमरी कला येथे कृषी सहायक  के बी ठोंबरे यांनी धान पिकासाठी 3 टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया प्रात्याक्षिक करून दाखवून त्याचे फायदे शेतकऱ्यांना पटवून दिले तसेच मंडळ कृषी अधिकारी वाघ सर कन्हान यांनी सोयाबीन उगवण सोयाबीन व तूर उगवण क्षमता चाचणी विषयी मार्गदर्शन केले .
सध्याची कोविड परिस्थिती लक्षात घेता व नियमाच्या अधीन राहून मोजक्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सदर मोहीम राबविण्यात येत असून त्याचे चित्रीकरण करून व्हाट्सएपच्या तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचवीत आहोत असे  जी बी वाघ यांनी नमूद केले , यावेळी मंडळ कृषी अधिकारी कन्हान  जी बी वाघ , डुमरी कला चे सरपंच  रामेश्वर राऊत, साटक ची सरपंच , बनपुरी चे सरपंच, चिचभवन चे सरपंच ,गावातिल नागरिक,शेतकरी , कृषी सहायक  के बी ठोंबरे,  एस एच साठे,  व्ही डी देशमुख व शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिष्यवृत्ती परीक्षा स्थगित करावी : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

Mon May 10 , 2021
*कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिष्यवृत्ती परीक्षा स्थगित करावी :* *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी:* धनराज बोडे *कन्हान*: पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वाढत्या कोविड १९ च्या महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा स्थगित करून त्या पूढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने राज्य […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta