शिक्षकदिनी ग्रा प बोरी व्दारे शाळेला संगणक भेट

जि प शाळा बोरी येथे विविध कार्यक्रमाने शिक्षक दिन थाटात साजरा

#) शिक्षकदिनी ग्रा प बोरी व्दारे शाळेला संगणक भेट. 


कन्हान : –  पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत कन्हान केंद्रातील जि प उच्च प्राथमिक शाळा बोरी (सिंगोरी) येथे विविध कार्यक्रमासह शिक्षक दिन थाटात साजरा करण्यात आला. 

     जि प उच्च प्राथमिक शाळा बोरी येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री शांताराम जळते यांच्या अध्यक्षेत तर शिक्षक मित्र म्हणुन शिवशक्ती आखाडा मंडळ प्रमुख कु पायल येरणे, सरपंच श्री सुभाष नाकाडे, शाळा व्य. समिती सभापती विष्णु नाकाडे आदीच्या प्रमुख उपस्थित ग्राम पंचायत बोरी (सिंगोरी) व्दारे शाळेला एक संगणक संच प्रदान करण्यात आला . मान्यवरांनी शिक्षक कार्याबद्दल माहिती देत या दिवसा पासुन ‘थॅन्कस अ टिचर ‘ (Thanks A Teacher) अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नाट्य, कविता गाय न व लेखन उपक्रम कार्यक्रम घेण्यात आला. मान्यवरांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर, सर्वपल्ली राधाकृष्णन, ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार व्यकत केले. कार्य क्रमास तृप्ती ईखार, श्वेता नागपुरे, शर्वरी कुंभलकर, मयुरी कुंभलकर, दीपक इंगोले, रोहित भोले आदी आजी, माजी विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमा चे सुत्र संचलन श्री अरविंद नंदेश्वर यांनी तर आभार कु तृप्ती येवले हिने केले. श्रीमती अनिता दुबले, सुनंदा कुंभलकर हयानी सहकार्य केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहर विकास मंच ने केले आयोजन

Sun Sep 6 , 2020
*शिक्षक दिवसा निमित्य शिक्षकांचा केला सत्कार ,  लावले वृक्ष * कन्हान शहर विकास मंच ने केले आयोजन कन्हान ता.5 : कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वेगाने वाढत आहे हे लक्षात ठेवुन,मास्क लावुन, सोशल डिस्टेसिंग चे पालन करुन शिक्षक दिवस कन्हान शहर विकास मंच च्या वतीने थटात साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली […]

You May Like

Archives

Categories

Meta