बिटोली — सालई(माहुली) पुलाची होणार उच्चस्तरीय चौकशी :उदयसिंह यादव

बिटोली — सालई(माहुली) पुलाची होणार उच्चस्तरीय चौकशी उदयासिह यादव(महासचिव,नागपुर जिल्हा काग्रेंस कमेटी)

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

पाराशिवनी (त प्र):-नागपूर जिल्ह्य़ातील पारशिवनी तालुका, ग्रामपंचायत माहुली अंतर्गत कन्हान नदीवरील मनसर-माहुली-सालई-बिटोली (इ.जि.मा. १२६) रस्त्यावरील मोठय़ापुलाच्या दुर्घटनेस जबाबदार कंत्राटदार व अधिकारी यांचेवर कार्यवाही करा, अशा आशयाचे निवेदन नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव उदयसिंग ऊर्फ गज्जू यादव यांनी विधासभा अध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री नितीन राऊतसह आदींना दिले होते. यावर त्वरित कार्यवाही करून संबंधितांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याने वरील मान्यवरांचे यादव यांनी आभार मानले.
४ सप्टेंबर २0२0 च्या शासन निर्णयानुसार नागपूर प्रादेशिक विभागात अतवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या माहुली पुलाची उच्चस्तरिय चौकशी करण्याकरिता मुख्य अभियंता तथा सहसचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यी समिती तयार करण्यात आली होती. मात्र, या समितीवर तक्रारकर्ते गज्जू यादव यांनी आक्षेप घेतला की, संबंधित पुलाचे बांधकाम करणारे ठेकेदार हे ठाणे (मुंबई)चे असल्याने मुंबईचे अधिकारी समितीत ठेवू नका. यानुसार सुधारित शासनादेश काढून मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय नवीन समिती बनविण्यात आली आहे.

या समितीकडे तक्रारी संदर्भातील मूळ कागदपत्रे पाठविण्यात आले असून, लवकरच पुलाच्या बांधकामासंदर्भातील सत्यता समोर येणार आहे. लवकरात लवकर चौकशी करून नवीन पुलाचे बांधकाम त्वरित करून पंचक्रोशितील नागरिकांचा मनस्ताप दूर करावा, अशी गज्जू यादवसह परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

नाबार्ड-१९, अर्थसहाय्यीत वर्ष २0१४-१५, ग्रामीण पायाभूत विकास निधी-१९ योजनेंतर्गत बांधकाम विभाग (विशेष प्रकल्प) नागपूर यांचेमार्फत नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुका, ग्रामपंचायत माहुली अंतर्गत मनसर-माहुली-सालई-बिटोली रस्त्यावरील (इ.जि.मा.-१२६) पेंच नदीवरील मोठय़ा बुडीत पुलाचे बांधकाम दि. १ जानेवारी २0१५ रोजी सुरू झाले. सदर काम दि. ३0 जून २0१८ रोजी पूर्णत्वास आले. कंत्राटदाराचे नाव मे. अजयपाल मंगल, रा. ठाणे यांच्याशी करारनामा क्र.: सी/१/डी.एल./ २0१४-१५ नुसार बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम सुरू केले होते व बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी दि.३0 जून २0१६ पर्यंत होता. कंत्राटदारावर या बांधकामाचे दोषदायित्व पाच वर्षे असल्याची माहिती आहे. परंतु, ऑगस्ट २0२0 मध्ये म्हणजे पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे नंतरच्या तिसर्‍या पावसाळ्यापूर्वी दोषदायित्व काळ संपण्यापूर्वीच पूल कोसळ्याने पुलाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.पूर्वीच्या समितीतील सदस्य
अध्यक्ष (मुख्य अभियंता तथा सहसचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय मुंबई), सदस्य (अधीक्षक अभियंता, संकल्प चित्र), सदस्य (अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, नागपूर) तसेच सदस्य सचिव (अधीक्षक अभियंता, संकल्प चित्र (पूल) मंडळ, नवी मुंबई)
नवीन समिती
अध्यक्ष (मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती), सदस्य (अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, अमरावती), सदस्य सचिव (कार्यकारी अभियंता, संकल्प चित्र, मंडळ, नागपूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बनपुरी येथे ग्राम संपर्क अभियानाचे आयोजन : पंजाब नॅशनल बॅकेचा उपक्रम

Mon Oct 19 , 2020
*बनपुरी येथे ग्राम संपर्क अभियानाचे आयोजन *पंजाब नॅशनल बॅकेचा उपक्रम बनपुरी गावात कन्हान ता.19 ऑक्टोबर पारशीवनी तालुक्यातील बनपुरी या गावात पंजाब नॅशनल बॅंक ,कन्हानच्या वतीने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत ग्रामपंचायत बनपुरी येथे ग्राम संपर्क अभियानाचे नुकतेच आयोजन बनपुरीच्या ग्रामपंचायत आवारात पार पडले. याप्रसंगी प्रबंधक गोपाल धोंगडी ,कृषी अधिकारी सचिन कसारे, श्रीमती […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta