कन्हान शहर विकास मंच कार्यकारणी चा विस्तार

कन्हान शहर विकास मंच कार्यकारणी चा विस्तार

#) कार्याध्यक्ष , उपाध्यक्ष, महासचिव पद घोषित. 


कन्हान : –  शहरात गेल्या दोन ते तीन वर्षा पासुन सात त्याने शहरातील विविध विषय प्रशासना समोर ठेवणा-या व सामाजिक कार्यक्रम नियमितपणे करणा-या कन्हान शहर विकास मंच मध्ये फेरबदल करून मंच अध्यक्ष यांच्या उपस्थितीत सर्वांच्या सहमतीने कार्या ध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव या पदाची घोषणा करून नवनिर्वाचित पदाधिका-यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

           कन्हान शहर विकास मंच गेल्या दोन ते तीन वर्षापासुन सातत्याने शहरातील विविध विषय प्रशास ना समोर ठेवण्याचे कार्य करीत असुन सामाजिक कार्यक्रम सुद्धा करीत आहे. या अनुषंगाने मंच मध्ये काही पद फेरबदल करून पुढे मंच मजबुत व क्रियाशि ल करण्याकरिता मंच कार्यालय गांधी चौक कन्हान येथे मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांचा प्रमुख उपस्थितीत  बैठक घेण्यात आली असुन या बैठकीत विविध पदांवर चर्चा करण्यात आली असुन सर्वांच्या सहमतीने मंच कार्याध्यक्ष पदावर ऋृषभ बावनकर, उपाध्यक्ष पदावर संजय रंगारी तर महासचिव पदावर सौ सुषमा मस्के यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व मंच पदाधिका-या नी नवनियुक्त पदाधिका-यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, सचिव प्रदीप बावने, कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, मुकेश गंगराज, अखिलेश मेश्राम, वैशाली खंडार, पौर्णिमा दुबे, प्रविण माने, प्रकाश कुर्वे, शाहरुख खान सह मंच पदाधिकारी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

टेकाडी शिवारात अज्ञात चोरांनी तीन दुकाना चे ताले तोडुन नगदी रूपए व कोलड्रिंक्स केले चोरी.

Mon Jul 12 , 2021
टेकाडी शिवारात अज्ञात चोरांनी तीन दुकाना चे ताले तोडुन नगदी रूपए व कोलड्रिंक्स केले चोरी. #) फिर्यांदी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवारात अज्ञात चोरांनी तीन दुकानाचे ताले तोडुन दुकानातुन ७,००० रुपए नगदी […]

You May Like

Archives

Categories

Meta