टेकाडी शिवारात अज्ञात चोरांनी तीन दुकाना चे ताले तोडुन नगदी रूपए व कोलड्रिंक्स केले चोरी.

टेकाडी शिवारात अज्ञात चोरांनी तीन दुकाना चे ताले तोडुन नगदी रूपए व कोलड्रिंक्स केले चोरी.

#) फिर्यांदी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवारात अज्ञात चोरांनी तीन दुकानाचे ताले तोडुन दुकानातुन ७,००० रुपए नगदी व कोल्ड्रिंक्स ची काही बोटल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी मोनु शुक्ला यांच्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी मोनु राजकुमार शुक्ला वय ३५ वर्ष राहणार टेकाडी रोड माधव नगरी येथे बेकरी चा धंदा करत असुन २ वर्षापासुन टेकाडी येथे शिवाय मिष्ठान भंडार मिठाई ची दुकान चालवत असुन रोज सकाळी ८:०० वाजता दुकान खोलत असुन सायंकाळी ५:०० वाजता दुकान बंद करत होता .
शुक्रवार दिनांक ९ जुलै २०२१ चे सायंकाळी ५:०० वाजता च्या सुमारास फिर्यादी मोनु राजकुमार शुक्ला हा दुकान बंद घरी गेला . फिर्यादी मोनु राजकुमार शुक्ला हा दुसर्या दिवशी शनिवार दिनांक १० जुलै २०२१ ला मोनु राजकुमार शुक्ला हा सकाळी उठुन घरा बाहेर दुकाना कड़े गेला असता मोनु राजकुमार शुक्ला यांना दुकानाचे दोन्ही ताले तुटले दिसले असुन यांच्या दुकाना बाजुला असलेले दोन दुकानाचे ताले तुटुन दिसल्याने फिर्यांदी यांनी या घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली असता पोलीसांनी घटनास्थळा वर पोहचुन पाहणी केली असता फिर्यादी मोनु राजकुमार शुक्ला यांच्या दुकानाचा लाॅकर तुटला दिसला व त्या मधुन सात हजार रूपए रोख व कोलड्रिंक्स चे काही बोटल न दिसल्याने फिर्यांदी मोनु राजकुमार शुक्ला यांनी कन्हान पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक २५४/२०२१ कलम ४५७,३८० भांदवि गुन्हा नोंद केला . सदर गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात हवलदार जियालाल सहारे ,व विरेन्द चौधरी हे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणार्यांन वर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी

Mon Jul 12 , 2021
शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणार्यांन वर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी #) भाजपा पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन कन्हान – राज्यात कोरोना ची दुसरी लाट पुर्णपणे संपली नसुन शासनाने ५ जुलै पासुन राज्यात पुन्हा बिकेंड लाॅकडाऊन लावण्यात आल्याने शहरात शासनाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे भाजपा पदाधिकार्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन नियमाचे उल्लंघन करणार्यां […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta